utpal parrikar : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार

utpal parrikar : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा :  माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पूत्र उत्पल पर्रीकर गोव्याची राजधानी पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. तत्पूर्वी त्यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मनोहर पर्रीकर यांनी पणजीचे नेतृत्व केलेले होते. utpal parrikar

पणजीतून भाजपच्या उमेदवारीसाठी उत्पल पर्रीकर यांचे नाव चर्चेत होते. परंतु राज्य कार्यकारिणीने केवळ आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याच उमेदवारीची शिफारस केलेली होती. केवळ पर्रीकर यांचा मुलगा म्हणून उत्पल यांना उमेदवारी देता येत नाही, असे पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

महापालिका निवडणुकीच्यावेळीच उत्पल यांनी भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना नगरसेवक होण्यासाठी पाठिंबा दिला होता. तेव्हापासून उत्पल हे प्रकाशझोतात आले. त्यानंतर त्यांनी पणजीतील लोकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केल्यानंतर ते विधानसभेची निवडणुकीची तयारी करीत असल्याचे स्पष्ट झाले होते.

utpal parrikar : पणजीच्या लोकांना देणार पर्याय : उत्पल

माझी काही मूल्ये आहेत, त्या मूल्यांसाठी मी लढतोय. पणजीच्या लोकांसाठी मला निवडणूक लढवायची आहे. त्या लोकांना मला राजकीय विकल्प द्यावयाचा आहे. मी निवडणूक लढवावी, असा त्यांचा आग्रह आहे. आपल्या राजकीय कारकीर्दीची चिंता गोव्यातील जनता करेल. अन्य पक्षाचा विचारही माझ्या मनात आलेला नाही. अपक्ष निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे आणि त्याच्या परिणामांना सामोरे जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news