राम मंदिरासाठी दिल्लीतील विद्यापिठे बंद राहणार

राम मंदिरासाठी दिल्लीतील विद्यापिठे बंद राहणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया आणि दिल्ली विद्यापीठ ही दोन्ही विद्यापिठे २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस बंद राहणार आहेत.

या विद्यापीठांनी आज जारी केलेल्या अधिसूचनेनुसार विद्यापीठे आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या संस्था, केंद्रे आणि कार्यालये सोमवारी अर्धा दिवस बंद राहणार आहेत. मात्र, सोमवारी आधीच ठरलेल्या परीक्षा आणि बैठका पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसारच होतील.

जामिया विद्यापिठाच्या अधिसूचनेत म्हटले आहे की केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचार्‍यांसाठी २२ जानेवारी रोजी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे,. त्या अनुषंगाने जामिया विद्यापिठाच्या च्या कार्यवाहक कुलगुरूंनी जामियासह विद्यापीठ आणि त्या अंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्था, केंद्रे आणि कार्यालयांना निर्देश दिले असून या सर्व संस्था सोमवारी (२२ जानेवारी रोजी) दुपारी अडीच वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. दिल्ली विद्यापीठाने आपल्या वेबसाइटवर अशी एक अधिसूचना जारी केली आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news