Maldives New President Swearing-in Ceremony : मालदीवच्या नव्या अध्यक्षांच्या शपथविधी समारंभात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू करणार भारताचे प्रतिनिधित्व 

kiren rijiju
kiren rijiju
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) मालदीवचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या शपथविधी समारंभात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मुइज्जू यांच्या शपथविधीसाठी मालदीवने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले होते. दरम्यान, भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने वतीने बुधवारी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे नाव जाहीर करण्यात आले. (Maldives New President Swearing-in Ceremony)
मोहम्मद मुइझ्झू यांनी सप्टेंबरमध्ये अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव केला.  सप्टेंबर २०१८ मध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांच्या मालदीव भेटीने दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचा पाया घातला होता. (Maldives New President Swearing-in Ceremony)
मालदीवचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी दिलेल्या निमंत्रणावरून, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू त्यांच्या शपथविधी समारंभात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान ते मालदीवला भेट देतील, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.  मालदीव हिंद महासागर क्षेत्रातील भारताचा प्रमुख सागरी शेजारी आहे आणि पंतप्रधानांच्या 'सागर' तसेच 'शेजारी प्रथम धोरण' या संकल्पनेत मालदीवचे विशेष स्थान आहे. या समारंभात भारताचे प्रतिनिधीत्व दोन्ही देशांमधील ठोस सहकार्य आणि मजबूत संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news