उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या तोफा आज धडाडणार; कोल्हापूर येथील सभेची तयारी पूर्ण

उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या तोफा आज धडाडणार; कोल्हापूर येथील सभेची तयारी पूर्ण
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि 1 मे) सायंकाळी गांधी मैदानात होणार्‍या सभेची तयारी पूर्ण झाली असून या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या तोफा धडाडणार आहेत. सभेसाठी महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी नियोजन केले आहे.

पवार, ठाकरे, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सभेत ठाकरे व पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गांधी मैदानात होणार्‍या या सभेसाठी शंभर व्यक्ती बसू शकतील असे भव्य स्टेज उभारले असून संपूर्ण मैदानात लाईटची व्यवस्था केली आहे. सभेच्या तयारीची आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांनी मंगळवारी पाहणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह बंदोबस्तासाठी 1200 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news