UAE Squad : टी-२० विश्वचषकासाठी युएईचा संघ जाहीर, सीपी रिजवानवर कर्णधारपदाची धुरा

UAE Squad
UAE Squad

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी टी-२० विश्वचषकासाठी युएई क्रिकेट बोर्डाने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. १६ ऑक्टोंबर पासून टी-२० विश्वचषकाची ऑस्ट्रेलियात सुरूवात होणार आहे. युएई क्रिकेट बोर्डाने कर्णधारपदाची धुरा सीपी रिजवान याच्या खांद्यावर सोपवली आहे. (UAE Squad)

या सात शहरांमध्ये रंगणार विश्वचषक स्पर्धा

ऑस्ट्रेलियात होणारी टी-२० विश्वचषक स्पर्धेत १६ ऑक्टोंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत एकूण ४६ सामने खेळवले जातील. हे सर्व सामने सिडनी, पर्थ, मेलबर्न, होबार्ट, जिलॉन्ग, ब्रिस्बेन आणि ॲडिलेड या सात शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. (UAE Squad)

विश्वचषकासाठी युएईने जाहीर केलेला संघ (UAE Squad) :

सीपी रिजवान (कर्णधार), व्रित्या अरविंद (उपकर्णधार), चिराग सूरी, मुहम्मद वसीम, बासिल हमीद, आर्यन लकड़ा, जवार फरीद, काशिफ दाउद, कार्तिक मयप्पन, अहमद रजा, जहूर खान, जुनैद सिद्दीकी, साबिर अली, अलीशान शराफू आणि अयान खान. (UAE Squad)

'या' दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान सामना

आशिया चषक स्पर्धेनंतर भारत पाकिस्तान टी-२० विश्वचषकात आमने-सामने असणार आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान हा सामना २३ ऑक्टोंबरला ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा यांच्‍या नेतृत्‍वाखाली टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत टीम इंडिया मैदनात उतरेल. (UAE Squad)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news