U19 World Cup : फायनलमध्ये इंग्लंडविरूद्ध भारताचे पारडे जड!

U19 World Cup : U-१९ वनडे क्रिकेट मध्ये भारताविरूद्ध फक्त २२ टक्के सामने जिंकला इंग्लंड
U19 World Cup : U-१९ वनडे क्रिकेट मध्ये भारताविरूद्ध फक्त २२ टक्के सामने जिंकला इंग्लंड

पुढारी ऑनलाईन डेस्क  : अंडर-१९ विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये सामना रंगणार आहे. हा सामना आज सायंकाळी ६ वाजता एटिंगाच्या सर विवियन रिचर्डस स्टेडियमवर खेळला जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात आत्तापर्यंत अंडर १९ क्रिकेटमध्ये ४९ वनडे सामने खेळले गेले आहेत. यातील भारतीय संघाने ३७ सामने जिंकले असून इंग्लंडला फक्त ११ सामन्यांत बाजी मारता आली आहे. तर एक सामना अनिर्णयीत राहीला आहे. (U19 World Cup)

टक्केवारीचा विचार केला तर इंग्लंडने भारताविरूद्ध फक्त २२ टक्के सामने जिंकले आहेत. भारताने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. तर इंग्लंड अफगानिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. U 19 टीम इंडियाने आठव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय संघाने सर्वांत जास्त चार वेळा U-19 विश्वचषक जिंकला आहे. तर इंग्लंड आज दुसऱ्यांदा फायनल खेळणार आहे. इंग्लंडने १९९८ मध्ये पहिल्यांदा फायनलमध्ये धडक मारली होती. तेव्हा न्यूझीलंडवर ७ विकेट्सने विजय मिळवून इंग्लंडने विश्वचषक उंचावला होता. (U19 World Cup)

फायनलमध्ये अनेक संघांना पहिल्यांदा फलंदाजी करण्याची इच्छा असते. अंडर १९ विश्वचषक स्पर्धेच्या गेल्या पाच फायनलमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ विश्वचषक पराभूत झाला आहे. भारताने २०१६ आणि २०१८ च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्या दोन्ही सामन्यांत भारताला पराभव स्विकारावा पत्करावा लागला होता. पण यंदा २०२२ च्या विश्वचषक स्पर्धेच्या काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच भारत आणि इंग्लंड संघांनी या विश्वचषक स्पर्धेत खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत. (U19 World Cup)

२०१९ मध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये शेवटचा सामना झाला होता. त्या सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने भारताला हरवले होते. अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड ८ वेळा आमने-सामने आले आहेत. यांतील ६ सामने भारताने जिंकले असून २ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने ८३ सामने खेळले आहेत त्यांतील ६३ सामने भारताने जिंकले आहेत. भारतीय संघ ७६.८३ टक्के सामने जिंकला आहे. तर इंग्लंड संघ ८१ सामने खेळला आहे. इंग्लंड च्या संघाने ६० टक्के सामने जिंकले आहेत. गेल्या तीन विश्वचषकात इंग्लंडचा संघ सेमिफायनलमध्येही धडक मारू शकलेला नाही. (U19 World Cup)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news