धक्कादायक! सांगलीतील डोंगरावर एका युवकासह दोन युवतींचे मृतदेह, जवळ सापडले चाॅकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार

धक्कादायक! सांगलीतील डोंगरावर एका युवकासह दोन युवतींचे मृतदेह, जवळ सापडले चाॅकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार

तासगाव; पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीतील शेख फरद्दीन बाबा (शेकोबा) डोंगरावर तिघांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्‍याचे समोर आले आहे. यामध्ये एक युवक तर दोन युवतींचा सामवेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिघांच्या मृतदेहाजवळ चाॅकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार सापडले आहेत.

आत्महत्या केलेल्‍यांमध्ये हरीश हणमंत जमदाडे (वय २१ रा, मणेराजुरी ), युवती (मूळ गाव जयगव्हाण ता, कवठेमहांकाळ सध्या रा. मणेराजुरी) तर एका युवतीची अद्याप ओळख पटली नाही. ही घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली. बुधवारी रात्री या तिघांनी विषारी द्रव्य प्राशन केले असावे. घटनास्थळी द्राक्ष बागेसाठी लागणारी विषारी द्रव्य असणारी बाटली सापडली आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. एका युवतीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

या घटनेने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. या तिघांनी नेमकी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news