NEET UG 2023 Result : नीट परिक्षेत यंदा दोन टॉपर; पहा रिझल्ट

NEET UG 2023 Result : नीट परिक्षेत यंदा दोन टॉपर; पहा रिझल्ट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल टेस्टींग एजन्सीने (NTA) मंगळवारी (दि. १३) वैद्यकीय नीट परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. यंदाच्या निकालात प्रभंजन जे आणि बोरा वरुन चक्रवर्ती या दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी घेतल्या जाणाऱ्या या परिक्षेत या दोघांनाही ७२० गुण मिळाले आहेत. (NEET UG 2023 Result)

७ मे २०२३ रोजी ही परिक्षा संपूर्ण देशभरात पार पडली. या परिक्षेच्या निकालानंतर वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशाला सुरुवात होणार आहे. यावर्षी (NEET UG 2023 Result) टॉपर आलेल्या दोघांपैकी प्रभंजन जे (Prabhanjan J) हा तमिळनाडूचा आहे, तर बोरा वरुन चक्रवर्ती (Bora Varun Chakravarthi)  हा आंध्र प्रदेश राज्यातील आहे. तसेच यंदाच्या नीट परिक्षेत मुलींनी देखील मोठे यश मिळविले आहे. (NEET 2023 Topper)

NEET UG 2023 Result : Cutt-Off

नीट परिक्षेच्या या वर्षीच्या निकालात उल्लेखनीय म्हणजे, सर्व श्रेणींमध्ये NEET UG च्या कट-ऑफच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे.

  • Unreserved, EWS: 720-137 marks (50th percentile)
  • OBC, SC, ST: 136-107 marks (40th percentile)
  • UR/EWS & PH: 136-121 (45th percentile)
  • OBE/SC+PH: 120-107 (40th percentile)
  • ST+PH: 120-108 (40th percentile)

NEET UG परिक्षेचा निकाल जाहीर करण्यास विलंब का?

मणिपूरमधील हिंसाचार आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन 06 जून रोजी NEET UG परीक्षा घेण्यात आली. एनटीएने 10 शहरांतील उमेदवारांना परीक्षेला बसण्याची संधी दिली होती. सुमारे 8,700 उमेदवार परीक्षेला बसले होते. उशिरा झालेल्या परीक्षेमुळे, मणिपूर उमेदवारांसाठी NEET UG निकाल जाहीर होण्यास थोडा विलंब झाला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news