नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती राजेश बिंदाल तसेच गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अरविंद कुमार यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या 34 वर गेली असल्याची माहिती केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी आज (शुक्रवार) सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
सर्वोच्च न्यायालयातील मंजूर न्यायमूर्तींची संख्या 34 इतकी आहे. वरील दोन न्यायमूर्तींच्या नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची सर्व पदे भरली गेली आहेत, हे विशेष. न्यायमूर्ती बिंदाल आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या नियुक्तीची शिफारस गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमने केली होती. गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या.
हेही वाचा :