पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने बुधवारी (दि.२३) इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चंद्रावर यान उतरवणारा भारत चौथा देश ठरला आहे. दरम्यान, यानंतर नेटकऱ्यांनी २०१४ साली न्यूयॉर्क टाईम्सने प्रकाशित केलेल्या एका कार्टुनची आठवण करुन दिली आहे. या कार्टुनच्या माध्यमातून भारताच्या मंगळयान मोहिमेची खिल्ली उडवण्यात आली होती. दरम्यान, भारताच्या चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर नेटकऱ्यांनी न्यूयॉर्क टाईम्सला आता आमच्या यशावरही व्यंगचित्र काढा, असे प्रतिउत्तर दिले आहे. (Chandrayaan-3)
बुधवारी (दि.२३) ६ वाजून ४ मिनीटांनी चंद्रयान-३ च्या विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर उतरले. २०१४ मध्ये मंगळयान मोहिमेच्या यशानंतर अमेरिकेतील वृत्तपत्राने एक व्यंगचित्र प्रकाशित केले होते. मंगळाभोवतीच्या कक्षेत रोबोटिक प्रोब टाकण्याची मोहीम अवघ्या ₹ 450 कोटींमध्ये पूर्ण झाली, ज्यामुळे ते आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त इंटरप्लॅनेटरी मिशनपैकी एक बनले. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि युरोपने मंगळावर यान पाठवले होते. (Chandrayaan-3)
न्यूयॉर्क टाईम्सने या व्यंगचित्रात एक माणूस दाखवला होता, जो भारतातील शेतकऱ्याचा वेश परिधान करुन गायीसमवेत "एलिट स्पेस क्लब"चे दार ठोठावत होता. जेथे दोन पाश्चिमात्य कपडे घातलेले पुरुष बसले होते. या व्यंगचित्राचा सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत होता. अनेकांनी या वृत्तपत्रावर वर्णद्वेषाचा आरोप केला होता. कारण, भारताच्या मोठ्या यशानंतर भारताची खिल्ली उडवण्यात आली होती. (Chandrayaan-3)
दरम्यान, आता न्यूयॉर्क टाईम्सकडून याबाबत माफी मागण्यात आली आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, न्यूयॉर्क टाइम्सचे संपादक अँड्र्यू रोसेन्थल यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते की "मोठ्या संख्येने वाचकांनी" कार्टूनबद्दल तक्रार केली होती. अंतराळ संशोधन हे आता श्रीमंत, पाश्चात्य देशांचे एकमेव डोमेन नाही, असा हेंग किम सॉन्ग यांचा हेतू होता. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे निरीक्षण करा. या व्यंगचित्रातील प्रतिमांच्या निवडीमुळे नाराज झालेल्या वाचकांची आम्ही माफी मागतो."
व्यंगचित्रावरून प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये भारत राष्ट्र समितीचे नेते वाय सतीश रेड्डी यांचाही समावेश आहे. ते म्हणाले की "तू हसलास, आमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावत आहेस. आज, आम्ही आमच्या विजयाने तुम्हाला शांत करतो! आता, पुढे जा आणि एक नवीन व्यंगचित्र काढा," त्यांनी जुने व्यंगचित्र शेअर करत ट्वीट केले आहे. (Chandrayaan-3)