Kkhushi Niramish (खुशी निरामिष) : तुम्हाला फिरायला खूप आवडते पण पैशांच्या अडचणीमुळे तुम्हाला अनेक वेळा फिरायला जमत नाही. कुटुंबासह आपण शिमला-कुल्लू मनाली, किंवा क्विन ऑफ हिल्स दार्जिलिंग, नैनिताल फिरून यावे. नाहीतर पत्नीसोबत ताजमहल लाल किल्ल्याची सफर Travel Tips करावी. आपल्या महाराष्ट्रातील सुंदर स्थळांसह राजस्थान, गुजरात किंवा कर्नाटक केरळ तामिळनाडू फिरून यावे, अशा इच्छा प्रत्येकाच्याच असतात. मात्र, अनेक वेळा पैशांच्या अडचणीमुळे हे शक्य होत नाही. बरोबर ना?
काळजी करू नका ही बातमी खास तुमच्यासाठीच केली आहे. फिरण्याची आवड अन् पैशांची अडचण दोघांचा ताळमेळ
कसा बसवावा. याच्या या काही खास टिप्स :
फिरायचे असेल तर त्यासाठी सर्वप्रथम वेळ हवा. त्यामुळे तुम्ही कधी, किती दिवस आणि किती जण फिरायला जाणार याचा तपशील काढून घ्या. त्यानंतर तुमचे बजेट ठरवा. तुमच्याकडे किती पैसे आहेत यावरून तुम्ही पुढचे नियोजन करू शकतात.
तंत्रज्ञानामुळे माणसांचे जीवन खूपच सोपे केले आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी फिरायला जायचे आहे त्या ठिकाणाची प्रथम इंटरनेट वरून सर्व माहिती काढून घ्या. उदाहरणार्थ तुम्ही जर आग्रा-मथूरा फिरण्याचे ठरवले तर नेटवरून प्रथम तुम्ही जिथे राहता तेथून या ठिकाणी जाण्यासाठी किती गाड्या उपलब्ध आहेत त्यांचे टाइम टेबल काय ? तसेच ज्या ठिकाणी जायचे आहे. तिथे तुम्हाला किती स्पॉट पाहायचे आहे. ही सर्व माहिती इंटरनेटवरील यू ट्यूब, फेसबुक आदि साइटवरून काढून घ्या. याचा फायदा तुम्हाला आपला खर्च कुठे वाचवायचा यासाठी मिळतो.
जर स्वस्तात फिरायचे असेल तर तुम्ही जितका जास्त सरकारी आणि सार्वजनिक वाहनांचा उपयोग करणार तितका तुम्हाला खर्च कमी येतो. रेल्वे बुक करताना सगळ्यात शॉर्टेस्ट मार्गाने जाणा-या गाड्या कोणत्या त्यांचे वेळापत्रक काय हे पाहा. शक्यतो रेल्वेसाठी सेकंड क्लास तिकिटांचे प्रि बुकिंग करून ठेवा. रेल्वेचा द्वितीय श्रेणीचा दर्जातून प्रवास खूप हायक्लास नसतो. मात्र अगदीच जनरलसारखा जीवघेणाही नसतो.
तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाणार असाल त्या ठिकाणी ज्या वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही योग्य वेळा पाळल्या तर तुम्ही कोणताही स्पॉट मिस करत नाही. तसेच तुम्हाला तिथे जाण्यासाठी असलेल्या सरकारी आणि सार्वजनिक वाहन सेवा उपलब्ध असते. सरकारी आणि सार्वजनिक वाहनांचा उपयोग केल्यास जवळपास निम्मा खर्च वाचतो. अनेकदा आपल्याला एखाद्या स्पॉटवर फोटोसेशनचा मोह आवरत नाही. किंवा जिथे थांबलो आहोत तिथून आंघोळ वगैरे करून निघण्यासाठीच उशीर होतो. त्यामुळे आपल्याला स्पॉटवर जाताना अन्य वाहनांचे ऑपशन्स शोधण्यासाठी वेळ मिळत नाही. हे टाळायचे असेल तर वेळा पाळा त्यामुळे तुमची वेळ आणि पैसे दोन्हींची बचत होते.
सध्या भारतात पर्यटनासाठी खूपच चांगले वातावरण तयार होत आहे. सरकार वेगवेगळ्या योजना आखून लोकांना पर्यटनासाठी चालना देत आहे. तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जात आहेत त्या ठिकाणच्या आसपासच्या भागाची माहिती नेटवरून काढून घ्या. जस्ट डायल, एअर बिन-बिन हॉटेल स्टे बुकिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यातून त्या भागाचा स्टेइंगचा अॅव्हरेज रेट काढून घ्या. तुमच्या बजेटनुसार राहण्यासाठीचे हॉटेल ठरवा. यामुळे देखिल पैशांची बचत होते. ज्या ठिकाणी फिरायला जाणार असाल तिथे जर जवळपास कुठे तीर्थक्षेत्र असेल तर याचा आणखी एक मोठा फायदा होतो. त्यामुळे त्या भागातील मुख्य तीर्थक्षेत्राचा शोध घ्या. कारण अनेक तीर्थक्षेत्र अशी असतात ज्यांचे स्वतःच्या राहण्याच्या व्यवस्था असतात. तिथे कमी पैशांमध्ये चांगल्या सुविधा भेटतात.
उदाहरणार्थ तुम्ही मथुरा फिरायला जात असाल तर श्रीकृष्ण जन्मभूमीचे जे मंदिर आहे तिथे आंतरराष्ट्रीय गेस्ट हाऊस आहे. मात्र ते प्रि बुकिंग करता येत नाही. तिथे जाऊनच ते बुक करावे लागते. कमी पैशात चांगली सेवा मिळते. तसेच तिथे राहून मग मथुरासह मथुराच्या आसपासची ठिकाणे तुम्ही पाहू शकता.
सध्या या टिप्स आजमावून पाहा… बाकी पुढील भागात
हे ही वाचा :