जवळाबाजार : टोमॅटोच्या दराने पेट्रोलचे दरही थबकले; ग्राहकांचे डोळे दरावर स्‍थिरावले

जवळाबाजार : टोमॅटोच्या दराने पेट्रोलचे दरही थबकले; ग्राहकांचे डोळे दरावर स्‍थिरावले

जवळाबाजार ; पुढारी वृत्‍तसेवा सध्या भाजी मंडईत लाल चुटूक टोमॅटोच्या दराने चांगलीच उचल खाल्‍ली आहे. सर्वसामान्यांच्या घरापासून हॉटेलमधील अनेक पदार्थात टोमॅटो हा सर्रास वापरला जातो. पण वाढलेल्‍या दरामुळे टोमॅटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या टोमॅटोचा दर १२० ते १५० रूपये किलोपर्यंत पोहोचला आहे. यामुळे बाजारात पिशवी घेवून गेलेल्‍या ग्राहकांना टोपलीत पहुडलेल्‍या लालबुंद टोमॅटोकडे लांबूनच पाहून समाधान मानावे लागत आहे. पेट्रोल पेक्षाही टोमॅटोचे दर वाढल्‍याने सोशल मीडियावर अनेक मीम्‍स व्हायरल होत आहेत. तर काही ठिकाणी बाजारात दुकानदाराने टोमॅटोच्या सुरक्षेसाठी बाउन्सर नेमल्‍याच्या बातम्‍या येत आहेत.

खरीप हंगामात पावसाचे दोन नक्षत्र संपले, पण खरीप हंगामातील पेरणीयोग्य पाऊस पडला नाही. यामुळे सध्याच्या परिस्थितीत भाजीपाल्‍याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या बाजारपेठेतही टोमॅटोची आवक कमी आहे. मालाचा तुटवडा निर्माण झाल्‍यामुळे बाजारपेठेत टोमॅटोचे भाव चांगलेच वाढले आहेत. राज्यात निसर्गाच्या अवकृपेने या वेळेस खरीप हंगामात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्‍यामुळे पावसाचे मृग व आद्धा दोन्ही नक्षत्र कोरडी गेली.

६ जुलै पासून पुनर्वस पावसाचे तिसरे नक्षत्र लागले, पण कोरडवाहू क्षेत्रातील पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. सध्याच्या परिस्थितीत जनावरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. परिसरातील बागायतदार क्षेत्र मोठ्याप्रमाणात आहे. वीज पुरवठा खंडित होत आहे. आठवडी बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली आहे. इतर भाजीपाल्‍याचे भाव शंभर रुपये किलो प्रमाणे बाजारात विक्री सुरू असून, सर्वात जास्त टोमॅटोचा भाव १२० रुपये ते १५० रूपये किलो प्रमाणे आहे. त्‍यामुळे पेट्रोलपेक्षाही टोमॅटोच्या दराची वाढ अधिक झाल्‍याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news