Sambhaji Chhatrapati : वाघनखे तीन वर्षांनी पुन्हा इंग्लंडला परत; संभाजीराजे छत्रपती यांची वेदनादायी प्रतिक्रिया

Sambhaji Chhatrapati : वाघनखे तीन वर्षांनी पुन्हा इंग्लंडला परत; संभाजीराजे छत्रपती यांची वेदनादायी प्रतिक्रिया
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : वाघनखे तीन वर्षांनी पुन्हा इंग्लंडला परत करण्यात येणार, त्यामुळे हे वेदनादायी आहे अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. त्यांच्या या प्रतिक्रयेनंतर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडिया एक्सवर केलेल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, लंडन येथील संग्रहालयात असणारे वाघनखे महाराष्ट्रात तीन वर्षांच्या मुदतीवर प्रदर्शनासाठी आणले जात आहे. हे वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधावेळी वापरले असल्याचा दावा राज्य सरकार करत आहे, मात्र अनेक इतिहास तज्ञांनी त्यामध्ये दुमत व्यक्त केले आहे. २०१७ साली मी याठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी तिथे लिहिलेल्या माहिती फलकावर केवळ तशी "शक्यता" असल्याचे लिहिलेले पाहण्यात आले होते. सरकारने या विषयावर सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ज्ञांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा.

ते पुढे म्हणाले की,  सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी भेट म्हणून दिलेल्या या वाघनखांस ऐतिहासिक मूल्य आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे आपल्या इतिहासाशी निगडीत ऐतिहासिक महत्त्व असणारे हे वाघनख केवळ तीन वर्षांच्या मुदतीवरच आणले जात आहे व मुदत संपल्यावर ते इंग्लंडला परत करावे लागेल, हे वेदनादायी आहे. त्यामुळे सरकारने हे वाघनख कायमस्वरूपी त्याच्या मूळ ठिकाणी, म्हणजेच महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न करणे अधिक गरजेचे आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news