बँक मॅनेजरचा तीन पोलिसांना कोटींचा गंडा; तणावाखाली एका पोलिसाने सोडले घर

बँक मॅनेजरचा तीन पोलिसांना कोटींचा गंडा; तणावाखाली एका पोलिसाने सोडले घर

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा ;  वाशीतील एका बँक मॅनेजरने जमीन मिळवून देण्याच्या बहाण्याने तीन पोलिसांकडून तब्बल 2 कोटी 31 लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तिघांपैकी कर्ज काढून बँक मॅनेजरला सुमारे एक कोटी रुपये परत मिळत नसल्याने तणावात असलेले पोलीस शिपाई सुंदरसिंह ठाकूर घरातून बेपत्ता झाले आहेत. त्यांनी आयुष्य संपवत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवल्याने त्यांच्या शोधासाठी कुटुंब व पोलिसांची धावाधाव सुरू आहे.

संबंधित बातम्या 

फसवणूक करणार्‍या बँक मॅनेजरचे नाव रमाकांत परिडा असून तो वाशीतील बँकेत कार्यरत आहे. त्याने फसवणूक केलेले तिघे नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यापैकी बेपत्ता झालेले उरणमधील पोलीस शिपाई सुंदरसिंह ठाकूर कळंबोलीत राहतात. वाशीत असताना ठाकूर व इतर दोघांची परिडासोबत ओळख झाली.

परिडाने खालापूर येथे जमीन मिळवून देतो असे सांगितल्याने या तिघांनी कर्ज काढून परिडाला पैसे दिले. ठाकूरने तब्बल 1 कोटी 8 लाख, दुसर्‍याने 85 लाख तर तिसर्‍याने 48 लाख रुपये गुंतवले होते. मात्र, परेडाने त्यांना जमीन तर दिलीच नाही. तसेच तो पैसेही परत करीत नसल्याचा आरोप आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news