Call Recording : मोबाईलवर बोलताना ‘हा’ आवाज येतोय? तर मग समजा, तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय!

Call Recording
Call Recording
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : (Call Recording) करणे हे अनेक देशांमध्ये बेकायदेशीर आहे. ते पाहता Google ने ही कॉल रेकॉर्डिंगचे थर्ड पार्टी ॲप बंद केले होते. म्‍हणजेच थर्ड पार्टी ॲपच्या मदतीने कॉल रेकॉर्डिंग केली जाऊ शकत नाही. यासाठी युजरला फोनच्या इनबिल्‍ट कॉल रेकॉर्डिंग फिचरचा वापर करावा लागेल.

इनबिल्‍ट कॉल रेकॉर्डिंग (Call Recording) फिचर ऑन केल्‍यानंतर समोरच्याला या विषयी माहिती मिळते. मात्र, बऱ्याचवेळा असे होते की, समोरचा व्यक्‍ती आपला कॉल रेकॉर्ड करत असतो आणि आपल्‍याला त्‍या विषयी माहिती होत नाही.

जर कॉल रेकॉर्ड (Call Recording) होत असेल तर, त्‍या विषयी शोधले जाऊ शकते. यासाठी तुम्‍हाला काही गोष्‍टीची काळजी घ्‍यावी लागेल. यासाठी तुम्‍हाला जास्‍त मेहनत घ्‍यायची गरज नाही. नवीन मोबाईल फोनमध्ये रेकॉर्डिंगची अनाउन्समेंट एकू येते. मात्र, जुन्या किंवा फीचर फोनवरून कॉल रेकॉर्डिंग केल्यावर अडचण येते. अनाउन्समेंट एकू आली नाही तर, दुसरी पद्धत अवलंबू शकता.

बीपच्या आवाजाकडे लक्ष द्या… 

कॉलच्या दरम्‍यान तुम्‍हाला बीपच्या आवाजावर लक्ष देणे गरजेचे आहे. जर कॉल दरम्‍यान बीप-बीपचा आवाज येत असेल तर, समजून घ्‍या की, तुमच्या कॉलचे रेकॉर्डिंग (Call Recording) केले जात आहे. जर कॉल रिसिव्ह केल्‍यानंतर अधिक वेळपर्यंत बीपचा आवाज येत असेल, याला तुमचा कॉल रेकॉर्ड होत असल्‍याचा इशारा समजावा.

नव्या येणाऱ्या ॲड्रॉइड फोन्स विषयी तुम्‍हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण रेकॉर्डिंग फिचर अनेबल करताच आपल्‍याला त्‍या विषयी अलर्ट केले जाते. ज्‍यामुळे तुम्‍हाला कॉल रेकॉर्डींगविषयी चटकण समजू शकते.

कॉल रेकॉर्डिंग आणि टॅपिंगमधील फरक 

कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल टॅपिंगला बऱ्याच लोकांकडून एकच समजले जाते. मात्र तसे नाही. कॉल टॅपिंगमध्ये तिसरी व्यक्ती दोन लोकांचे संभाषण रेकॉर्ड करत असते. यासाठी दूरसंचार कंपन्यांचीही मदत घेतली जाते. न्यायालयाच्या परवानगीनंतरच तपास यंत्रणा कॉल टॅपिंग करू शकतात. खाजगी सुरक्षा एजन्सीद्वारे कॉल टॅपिंग देखील वेगवेगळ्या साधनांचा वापर करून केले जाते.

साधारणपणे कॉल टॅपिंगमध्ये कॉल करणाऱ्यांना थेट माहिती नसते. पण अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे लक्ष दिल्यास कॉल टॅप होत आहे की नाही हे समजू शकते. उदाहरणार्थ, जर प्रत्येक वेळी तुम्ही एखाद्याला कॉल करत असाल आणि मध्येच सिग्नल जाण्याचा आवाज येत असेल, जसे की जुन्या रेडिओमध्ये येत असेल, तर सावध व्हा. वारंवार कॉल ड्रॉप होणे हे देखील अनेक वेळा कॉल टॅपिंगचे लक्षण आहे, परंतु केवळ कॉल ड्रॉप्समुळे कॉल टॅप होत आहे असे म्हणता येणार नाही.

दुसऱ्या आवाजाकडेही लक्ष द्या 

कॉल दरम्यान, बीप ऐवजी, एक मोठा बीपचा आवाज किंवा इतर टोनचा आवाज येत असल्यास, तुम्‍ही सतर्क झाले पाहिजे यावरूनही कॉल रेकॉर्डिंग विषयी तुम्‍हाला माहिती मिळू शकते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news