Garlic Tea : लसणाचा चहा प्यायल्याने ‘हे’ आहेत सर्वोत्तम फायदे

Garlic Tea : लसणाचा चहा प्यायल्याने 'हे' आहे सर्वोत्तम फायदे
Garlic Tea : लसणाचा चहा प्यायल्याने 'हे' आहे सर्वोत्तम फायदे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लसूण भारताच्या प्रत्येक स्वयंपाक घरातील महत्वाची भाग आहे. आपलं जेवण टेस्टी करण्याचं काम लसूण करतं. परंतु तुम्हाला माहीत आहे का? लसून उत्तम आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. आपण लसणाच्या चहापासून (Garlic Tea) मिळणाऱ्या फायद्यांचा विचार करू या. लसणाचा चहा करून पिल्यानंतर आरोग्याच्या कोणत्या तक्रारी पळून जातात, हे पाहू या…

पचनक्षमता वाढते : रिकाम्या पोटी लसणाचा चहा प्यायल्याने मेटाबाॅलिज्म वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर आपली पचनक्षमता दुपटीने वाढते.

हृदय निरोगी राहते : लसणाच्या चहाने हृदयविकाराचा त्रास होत नाही आणि हृदयाच्या अनेक व्याधी कमी होतात. त्याचबरोबर रक्ताभिसरणाला प्रोत्साहन देते.

पित्ताचा त्रास कमी होतो : आपल्या शरीरातील विषारी द्रव्यांना बाहेर काढण्यास लसणाचा चहा खूप महत्त्वाची मदत करतो. तसेच पित्ताचा त्रासही कमी होतो.

वजन कमी करते : सर्वात महत्वाचे… वजन कमी करण्यास लसणाचा चहा अत्यंत महत्वाचा आहे. कारण, भूखेला थांबवून ठेवण्याची शक्ती लसणाच्या चहात आहे आणि खाण्यावर नियंत्रण ठेवण्यात लसणाचा चहा मदत करतो.

कोलेस्ट्रेराॅल नियंत्रीत राहतो : लसणाचा चहा कोलेस्ट्रेराॅल असणाऱ्या लोकांसाठी खूप महत्वाचा मानला जातो आणि डाॅक्टरही तो सल्ला देतात. तसेच कोलेस्ट्रेराॅलसंबंधित विकार कमी करण्यास मदत करते.

लसणाचा चहा कसा तयार कराल? 

हा लसणाचा चहा कसा तयार करायचा, हा प्रश्न पडला असेल? तर, सोप्पं आहे. तीन कप पाणी घेऊन त्याला उकळवा. त्यात ३-४ लसणाच्या फोडी कापून टाका. काही मिनिटांपर्यंl उकळू द्या. त्यात लिंबाचा रस आणि मध मिसळा. त्याचबरोबर आलेदेखील टाका. झाला तुमचा लसणाचा चहा. हा चहा (Garlic Tea) तुम्ही दिवसभर वापरू शकता.

पहा व्हिडीओ : अभिनेत्री अदिती सारंगधरने बनवला फक्कड चहा

हे ही वाचा…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news