बीड : गेवराई तालुक्यात चोरट्यांनी एकाच रात्री फोडली पाच दुकाने

file photo
file photo

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे गुरूवारी ( दि.८) रोजी चोरट्यांनी एकाच रात्री पाच दुकाने फोडल्याची घटना उघडकीस आली. याबाबतची माहिती अशी की, पाचेगाव येथे मध्यरात्री बसस्थानक परिसरातील ज्ञानराज व देवा हे दोन मेडिकलवर चोरट्याने डल्ला मारला. यानंतर येथून जवळच असलेल्या हायवेवरील फुलझळके मेडिकल, बोरगाव रस्त्यावर असलेले बाबुराव गाडे यांचे माऊली ॲग्रो एजन्सी आणि शुभम ज्वेलर्स या पाच दुकानांचे शटर उचकटून फोडण्यात आले. या सर्व ठिकाणावरून चोरट्यांनी रोख रक्कम तर शुभम ज्वेलर्समधून चांदीचे दागिन्यासह रोख रक्कम चोरुन पोबारा केला.

या दरम्यान घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस स्टेशनचे डीबी पथकाचे प्रमुख प्रफुल्ल साबळे यांनी या ठिकाणी भेट दिली असून पुढील तपास करत आहेत. चोरट्यांनी एकाच दिवशी पाच दुकाने फोडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहेत.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news