Satyaprem Ki Katha : कार्तिक-कियाराच्या रोमॉन्टिक चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी भेटीला?

Satyaprem Ki Katha
Satyaprem Ki Katha

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'भूल भुलैया २' या चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी आगामी 'सत्यप्रेम की कथा' ( Satyaprem Ki Katha ) या चित्रपट घेवून येत आहेत. हा चित्रपटाच्या थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे कार्तिक-कियारा दोघांचे चाहते त्याच्या या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आता ट्रेलर रिलीज डेटबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे चाहत्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.

रिपोर्टच्या माहितीनुसार, कियाराच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' ( Satyaprem Ki Katha ) चा ट्रेलर पुढील आठवड्यात म्हणजे, बुधवारी (दि. ७ जून) रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही. तर याबाबतचा अंतिम निर्णय आज ४ जूनपर्यंत घेतला जाणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. तसेच ट्रेलर लॉन्च कार्यक्रम कधी आयोजित केला जाईल याचीही माहिती समोर आलेली नाही.

याआधी 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाचा टिझर आणि 'नसीब' या गाण्याला चाहत्यांनी भरभरून प्रेम केले आहे. धमाकेदार ट्रेलरमधून चाहत्यांना चित्रपटाची कथा आणि इतर पात्रांची माहिती मिळणार आहे. 'सत्यप्रेम की कथा' चे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले आहे. हा चित्रपट २९ जून २०२३ रोजी रिलीज होणार आहे. कार्तिक आणि कियारासोबत या चित्रपटात गजराज राव आणि सुप्रिया पाठक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. यामुळे चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात कार्तिक आणि कियारा अडवाणी दुसऱ्यांदा पडद्यावर एकत्रित दिसणार आहेत. याआधी ते दोघेजण 'भूल भुलैया २' मध्ये दिसले होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news