‘या’ TOP 10 इलेक्ट्रिक कार देशात लॉन्च होणार ! BMW, महिंद्रासह TATA च्या तीन कार्सचा समावेश

‘या’ TOP 10 इलेक्ट्रिक कार देशात लॉन्च होणार ! BMW, महिंद्रासह TATA च्या तीन कार्सचा समावेश

पुढारी ऑनलाईन डेस्क

गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक कारचा ट्रेंड वाढला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानामुळे इलेक्ट्रिक वाहनांनाही चालना मिळाली आहे. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे हैराण झालेले लोकही इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करत आहेत. इलेक्ट्रिक व्हेईकल सोसायटी (SMEV) ने दावा केला आहे की भारतात ईव्हीची विक्री यावर्षी १० लाख युनिटचा टप्पा ओलांडेल.

देशात आतापर्यंत अनेक इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आल्या आहेत आणि २०२२ हे इलेक्ट्रिक कारसाठीही मोठे वर्ष असेल अशी अपेक्षा आहे. कारण कार निर्माते यावर्षी अनेक कार लॉन्च करणार आहेत. आज आम्ही त्यापैकी टॉप १० कारबद्दल बोलत आहोत.

1. टाटा अल्ट्रोझ ईव्ही

Nexon EV ला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर टाटा आपली नवीन इलेक्ट्रिक कार Altroz ​​EV लाँच करणार आहे. ही कंपनीच्या नवीन एजाइल लाइट अॅडव्हान्स्ड (ALFA) प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. ही पहिल्यांदा 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती, जी कंपनीच्या Ziptron तंत्रज्ञानासह येईल. 250 ते 300 किमी दरम्यानची रेंज मिळणे अपेक्षित आहे.

2. BMW i4

लक्झरी ऑटोमेकर BMW 2022 मध्ये भारतात आपली दुसरी इलेक्ट्रिक कार i4 लॉन्च करू शकते. त्याने नुकतीच iX-इलेक्ट्रिक कार देशात लाँच केली. BMW i4 मालिका हा ग्रॅन कूपचा इलेक्ट्रिक प्रकार आहे आणि थोडा सुधारित डिझाइनसह येतो. हे 83.9 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह सुसज्ज असण्याची अपेक्षा आहे. ती 450 किमी पेक्षा जास्त रेंज मिळवू शकते.

3. व्होल्वो XC40 रिचार्ज

Volvo XC40 रिचार्ज 2021 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा होती, परंतु सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे विलंब झाला. आता यावर्षी जूनमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. कार 78 kWh बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे आणि एका चार्जवर 418 किमी पर्यंतची रेंज देते.

4. मिनी कूपर SE

Mini Cooper SE कंपनीच्या वेबसाइटवर सूचीबद्ध केली गेली आहे आणि वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. ही 32.6 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह 270 किमीच्या कमाल रेंजसह येण्याची अपेक्षा आहे.

5. महिंद्रा eKUV100

महिंद्रा eKUV100 डिझाइनच्या बाबतीत KUV100 सारखीच आहे. ही 2020 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. ग्लोबल चिप नसल्यामुळे या कारच्या लॉन्चिंगलाही उशीर झाला. 2022 मध्ये तिची घोषणा होऊ शकते. यात 15.9 kWh चा बॅटरी पॅक मिळेल. तसेच, याची कमाल 140 किमीची रेंज मिळेल.

6. टाटा टियागो ईव्ही

Altroz ​​EV व्यतिरिक्त, Tata भारतात Tiago EV लाँच करू शकते ज्याची किंमत 10 लाख असू शकते. ही कार 2022 च्या उत्तरार्धात लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्याची रचना सध्याच्या टाटा टियागो कारसारखी असू शकते.

7. रेनॉल्ट जॉय

रेनॉल्ट आपली पहिली इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करू शकते. जोए ही एंट्री-लेव्हल कार असेल. ही 2020 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आले होती. हे 52 kWh बॅटरी पॅक आणि 394 किमीची कमाल रेंज करेल अशी अपेक्षा आहे.

8. मर्सिडीज बेंझ EQS

मर्सिडीज-बेंझ EQS, जी लोकप्रिय S-क्लासची इलेक्ट्रिक आवृत्ती आहे, 2022 च्या उत्तरार्धात देशात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. 107.8 kWh बॅटरी पॅक आणि एका चार्जवर 770 किमी पर्यंतची रेंज मिळणे अपेक्षित आहे.

9. टाटा सिएरा

कंपनीच्या सर्वात प्रतिष्ठित कारपैकी एक, Tata Sierra 2022 मध्ये भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. 2020 ऑटो एक्स्पो दरम्यान ती पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आली होती.

10. रेनॉल्ट के ZE

Renault K ZE कंपनीच्या Kwid हॅचबॅकवर आधारित आहे आणि त्याची किंमत Renault Zoe पेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे. ही कार 2020 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती आणि ती 26.8kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे, ज्याची कमाल रेंज 260 किमी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news