Temperature : मुंबईचे तापमान चाळिशी गाठणार

file photo
file photo

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईमध्ये गुरुवारी कमाल तापमान ( Temperature ) 34 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. मात्र, पुढील आठवड्यात सूर्य आग ओकणार आहे. मंगळवारी पारा चाळिशीच्या घरात जाणार आहे.

या आठवड्यात सरासरी तापमान 24/33 इतके राहिले. सांताक्रूझ वेधशाळेच्या अंदाजानुसार, शुक्रवारी (25/33) किमान आणि कमाल तापमानात प्रत्येकी एका अंशाने घट अपेक्षित आहे. वीकेंडला कमाल तापमानात थोडी घट येईल.

पुढील आठवड्यापासून तापमानात वाढ होणार आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. मंगळवारी (16 एप्रिल) या तापमानाचा अनुभव अपेक्षित आहे. शिवाय आठवडाभर आभाळ अंशतः ढगाळ असण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news