Fighter
Fighter

Fighter : हृतिक रोशनच्या ‘फायटर’ मध्ये भारदस्त ॲक्शन; शूटिंग पूर्ण

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन, दीपिका पादुकोण याच्यासोबत दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी आगामी 'फायटर' ( Fighter ) या चित्रपटाचे शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. सोशल मीडियावर याबद्दलची एक खास स्टोरी त्यांनी शेयर करून माहिती दिली आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट सध्या चर्चेत असल्याने चाहते आणि इंडस्ट्रीतील लोक त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या 

'फायटर' चित्रपटाची झलक शेअर करून दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद सतत त्याच्या चाहत्यांसाठी काही न काही नवीन घेऊन येत असतात. आता शूटिंगचा प्रवास संपला असून हा हाय-ऑक्टेन अॅक्शन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

हृतिक रोशन, अनिल कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'फाइटर' हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटात सिनेमॅटिक अॅक्शन सीक्वेन्स साहसी हवाई युक्ती आणि आकर्षक कथानक पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth Anand (@s1danand)

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth Anand (@s1danand)

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth Anand (@s1danand)

logo
Pudhari News
pudhari.news