Panchak Movie : उत्सुकता ५ जानेवारीची; माधुरीच्या ‘पंचक’ चा दुसरा ट्रेलर रिलीज

Panchak Movie
Panchak Movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित 'पंचक' ( Panchak Movie ) हा चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहे. आता या चित्रपटाचा आणखी एक उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. इतकेच नाही तर बॉलिवूडमधीलही काही नामवंत कलाकारांनी 'पंचक' च्या ट्रेलरचे भरभरून कौतुक केले आहे.

संबंधित बातम्या 

नवीन वर्षात प्रदर्शित होणारा Panchak Movie हा चित्रपट मल्टीस्टारर आहे. जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. तर आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे लेखन राहुल आवटे यांनी केलं आहे.

'पंचक' च्या पहिल्या ट्रेलरने खूपच कौतुक केलं गेलं. आता त्यात दुसऱ्या ट्रेलरने अधिक भर टाकली आहे. खोतांच्या घराला पंचक लागल्याने 'आता कोणाचा नंबर ?' हा प्रश्न अवघ्या घराला पडलेला असतानाच, अनेक जण आपापल्या परीने हे संकट टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या गोंधळात घरात सर्कस होत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे?, याचे उत्तर प्रेक्षकांना ५ जानेवारी रोजी मिळणार आहे. कथा, दिग्दर्शन, कलाकार, संगीत या सगळ्याच चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.

माधुरी दीक्षित म्हणाली की, 'पडद्यावरील आणि पडद्यामागील प्रत्येकाची निवड ही योग्य आहे. चित्रपट पाहताना याचा प्रत्यय प्रेक्षकांना येणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान थोड्या अडचणी आल्या. परंतु, आज जेव्हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे, तेव्हा मनाला समाधान मिळतेय. मला खात्री आहे, चित्रपटावर प्रेक्षक नक्कीच भरभरून प्रेम करतील.'

तर 'पंचक'च्या निर्मितीबद्दल डॉ. श्रीराम नेने म्हणतात, 'ज्या वेळी आम्ही या चित्रपटाची कथा ऐकली, तेव्हाच आम्ही निर्णय घेतला हा चित्रपट करायचाच. चित्रपटाच्या प्री प्रॉडक्शनसाठी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि आम्ही सगळ्यांनी ही प्रोसेस एन्जॉय केली. आता आमचे हे एक कुटुंब बनले आहे. मी सुद्धा या चित्रपटाकडून, कलाकारांकडून बरंच काही शिकलो.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news