पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉनचा आगामी 'आदिपुरुष' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या चित्रपटाचे नवनविन पोस्टर, पहिलं गाणे आणि धमाकेदार ट्रेलर काही दिवसापूर्वी चाहत्याच्या भेटीस आला आहे. यानंतर आता 'आदिपुरुष' चित्रपटातील दुसरे गाणे ( Adipurush Song ) रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याना सोशल मीडियावर एका तासात १.२ मिलियन व्ह्युज मिळाले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी 'आदिपुरुष' चित्रपटातील आणखी एक धमाकेदार गाणे ( Adipurush Song ) रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल 'राम सिया राम' असे आहेत. या गाण्यात राम आणि त्याचा भक्त हनुमान दोघेजण सीतामातेच्या शोधात असलेले दाखविण्यात आले आहे. शेवटी सीता रावणाच्या भागातील अशोक वाटीका येथे सापडते. यानंतर राम आणि रावणामध्ये युद्ध होते. अशी रामायणातील कथा चित्रपटात दाखविण्यात आली आहे. हे गाणे चाहत्याच्या पसंतीस उतरले आहे. प्रभासने त्याच्या इन्स्टाग्रामवर गाणे शेअर करत लिहिले आहे की, 'आदिपुरुष' चा आत्मा'.
गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतसिर शुक्ला यांनी लिहिले आहेत. तर सचेत टंडन आणि परंपरा टंडनने हे गाणं गायिले आहे. हे गाणे हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषेत रिलीज करण्यात आले आहे.
प्रभास, कृती सेनॉनसोबत या चित्रपटात सनी सिंह, देवदत्त नागे महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या गाण्याच्या आधी 'जय श्री राम' (Jai Shri Ram) हे गाणे चाहत्याच्या भेटीस आले होते. या गाण्याला संगीत दिग्दर्शन अजय-अतुल यांनी दिले आहे. 'आदिपुरुष' हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचा :