खिलार बैलांचा भाव वधारला

खिलार बैलांचा भाव वधारला

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा

राज्यात बैलगाडी शर्यतींना परवानगी दिल्यानंतर खिलार बैलांना लाखमोलाचा भाव आला आहे. हजारात असणारा भाव लाखात गेला आहे. चपळ असणार्‍या खिलार बैलांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

ज्या बैलाला वीस ते तीस हजार रुपयेही किंमत नव्हती, त्याला आता लाखमोलाची किंमत आली आहे. ज्यांच्याकडे जातिवंत खिलार आहेत, त्यांच्याकडे आता खरेदीसाठी चौकशी सुरू झाली आहे.

शर्यती बंद असल्याने खिलार जनावरांचे व्यवस्थापन करणे कठीण होऊन गेले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाने खिलारचे संगोपन करणार्‍यांमध्ये आनंदाचे भरते आले आहे. शर्यतींना परवानगी मिळाल्यामुळे बैल बाजार तेजीत राहील असा अंदाज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news