मुंबईमध्ये दर किलोमीटरवर 2,300 वाहने!

मुंबईमध्ये दर किलोमीटरवर 2,300 वाहने!
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील वाहतूक कोडींमध्ये गेल्या दोन वर्षात तब्बल अडीच लाख वाहनांची भर पडली आहे. मुंबईतील एकूण वाहनांची संख्या 46 लाखांच्या घरात पोहोचली असून यात दुचाकीची संख्या 28 लाख आहे. वाढत्या वाहनांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या आता आणखीनच गंभीर होत आहे. वाढत्या वाहन संख्येमुळे शहरातील वायू आणि ध्वनी प्रदूषणात देखील वाढ होत असल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सध्या मुंबईतील दर किलोमीटर रस्त्यावर 2 हजार 300 वाहने आहेत.

आतंरराष्ट्रीय दर्जाचे शहर असलेल्या मुंबईत दोन हजार किलोमीटरचे रस्ते आहे.शहरात सध्या सुमारे 420 विविध प्रकल्पांचे आणि 25 टक्के रस्त्याचे काम सुरु आहे.यामुळे शहरात वाहतूकीच्या कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईकरांना अंतर पार करण्यासाठी निश्चित वेळेपेक्षा सुमारे 75 टक्क्यांहून अधिक वेळ लागत आहे.

शहराची लोकसंख्या आणि नवीन वाहनांची संख्या झपाट्याने वाढते आहे. वाढत्या वाहनांच्या तुलनेत रस्ते अपुरे आहेत. त्यातच जे रस्ते उपलब्ध आहेत, त्यावर कोणते न कोणते काम सुरु असल्याने रस्त्याच्या लेनची संख्या घटली आहे. शहरातील वाहतूक कोंडी वाढली. रस्ते आणि वाहनांची संख्या पाहता सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरमध्ये शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाहतूकीची मोठी कोंडी होते. त्यामुळे मुंबईकरांना सर्वाधिक वेळ वाहतूकीत खर्च करावा लागतो.

वायू-ध्वनी प्रदूषणात भर

वाहनांमुळे सर्वाधिक वायू प्रदूषण होते. वाहनांमधून बाहेर पडणार्‍या धुरामुळे हवेची गुणवत्ता खालावते. त्याशिवाय हल्ली प्रत्येकाला घाई असल्याने वाहतूक कोंडीत हॉर्न वाजविणार्‍यांची संख्या जास्त आहे. सतत हॉर्न वाजविल्याने ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. हॉर्न वाजविल्याने होणार ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दर बुधवारी नो हॉर्न प्लीज मोहिम देखील राबविली आहे.

वाहनांची घनता

वाहनांच्या घनतेमध्ये इतर शहरांच्या तुलनेत मुंबई आघाडीवर आहे. मुंबईत प्रति किमी रस्त्यावर 2,300 वाहने आहेत. चेन्नईत प्रति किमी 1,762 ,कोलकाता 1,283 , बेंगळुरू 1,134 आणि दिल्ली 261 वाहने आहेत.

मुंबईतील वाहनांची संख्या

वर्ष                वाहने
2020          39 लाख
2021          41 लाख
2022          43.5 लाख
2023          45.5 लाख
मार्च 2024    46 लाख

चारचाकी-दुचाकींची संख्या

वर्ष                  चारचाकी                     दुचाकी
2020               11 लाख                     23.5 लाख
2021             11.7 लाख                       25 लाख
2022             12.3 लाख                    26.3 लाख
2023 b            13 लाख                       28 लाख
मार्च 2024      13.2 लाख                    28.3 लाख

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news