11th Admission 2022 : अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार…

11th Admission 2022 : अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून 25 जुलैपासून पहिल्या फेरीला सुरुवात झाली आहे. आज बुधवारी (दि.3) पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये 6ऑगस्टपर्यंत आपली प्रवेश प्रक्रिया निश्चित करायची आहे. सीबीएसईचा निकाल लांबल्यामुळे जवळपास ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया जवळपास एक महिना उशीराने होत आहे.

प्रवेशाची पहिली यादी आज सकाळी 10 वाजता पोर्टलवर जाहीर होईल. यामध्ये पहिल्या फेरीचे कट ऑफ पोर्टलवर दर्शविले जातील. येत्या 6 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत मिळालेल्या महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करता येईल. विद्यार्थ्यांनी 'प्रोसीड फॉर अॅडमिशन'वर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रवेश निश्चित करायचा आहे.

6 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्यानंतर 7 ऑगस्टला अकरावी प्रवेशाच्या दुस-या फेरीसाठी रिक्त जागा जारी केल्या जातील. त्यानंतर दुस-या फेरीला सुरूवात होईल. विद्यार्थ्यांना जर पहिल्या फेरीत मिळालेले कॉलेज पसंती क्रमांक नंबर एकमध्ये असेल तर विद्यार्थ्याला त्या महाविद्यालायत प्रवेश घेणे बंधनकारक असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news