एकदा येऊन तर बघा : फुलंब्रीकर कुटुंबात हास्याचा कल्लोळ

एकदा येऊन तर बघा
एकदा येऊन तर बघा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकमेकांशी असलेले रुसवे-फुगवे आणि छोटया-छोटया गोष्टींमधून हसत- खेळत गंमतीदार आयुष्य जगणारं असंच एक भन्नाट 'फुलंब्रीकर कुटुंब' येत्या २४ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येत आहे. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' हा चित्रपटात कुटुंबाच्या आणि त्यांच्या नात्यातील गंमत अनुभवण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

संबंधित बातम्या 

श्रावण, फाल्गुन आणि कार्तिक या तीन भावांची ही गोष्ट चित्रपटात दाखविले आहे. फुलंब्रीकर कुटुंब हॉटेल व्यवसाय सुरु करतात, पण ग्राहक यावेत यासाठी त्यांना काय आणि किती प्रयत्न करावे लागतात?, गिऱ्हाईकांची वाट पाहावी लागते, गिऱ्हाईक हॉटेलमध्ये आल्यावर हे कसे एका प्रॉब्लेममध्ये अडकत जातात? आणि मग पुढे काय- काय होतं? त्यातून त्यांच्यावर कोणकोणते प्रसंग ओढवतात आणि त्यालाही मंडळी कशी सामोरी जातात? याची गंमतीशीर गोष्ट 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपट अनुभवायला मिळणार आहे.

गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने फुलंब्रीकर कुटुंबात पाहायला मिळणार आहेत. या पाच जणांसोबत सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसातकर, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदी कलाकारांची भली मोठी फौज चित्रपटात आहे. हे कुटुंब तुम्हाला निखळ हास्याची मेजवानी देईल, असा विश्वास दिग्दर्शक प्रसाद खांडेकर व्यक्त केला आहे.

येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट येत आहे. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची आहे. तर सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर यांची आहे. लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news