Thane Lok Sabha Election : शासनाच्या मैदानाचा जितेंद्र आव्हाडांकडून व्यावसायिक वापर : मुल्ला, परांजपे

Thane Lok Sabha Election
Thane Lok Sabha Election

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  कळव्यातील खारभूमी मैदानावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये चांगलीच जुंपली असून शासनाच्या या मैदानाचा आव्हाडांकडून व्यावसायिक वापर होत असल्याचा पलटवार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला आहे. आव्हाडांना जनतेविषयी एवढेच प्रेम असले तर हे मैदान सर्वांसाठीच मोफत खुले करावे असे आव्हान मुल्ला आणि परांजपे यांनी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे. दुसरीकडे जे कार्यकर्त्यांचे होऊ शकले नाही ते पक्षाचे काय होणार, असा प्रतिटोलाही आव्हाड यांना या दोन्ही नेत्यांनी लगावला आहे. ( Thane Lok Sabha Election )

कळव्यातील खारभूमी येथील मैदान जिल्हाधिकार्‍यांकडून बंद करण्यात आल्याने यावरून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे मैदान अजित पवार यांच्याच आदेशाने बंद करण्यात आले असल्याचा आरोप केला होता. याशिवाय या राजकारणात मुलांचे नुकसान होत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. बुधवारी आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतित्युर दिले आहे. औरंगजेबला जसे संताजी, धनाजी दिसायचे, तसेच आव्हाडांना स्वप्नात अजित पवार दिसत असल्याचे परांजपे म्हणाले.

हे ग्राउंड शासनाच्या मालकीचे असून आव्हाडांनी मात्र आपली जहागीर असल्यासारखे या मैदानाचा वापर केला आहे. मैदानाचे रीतसर भाडे भरूनही आव्हाडांच्या गुंडांकडून मला अडवण्यात आले होते असे परांजपे यांनी सांगितले. कोणत्याही संस्थेला कार्यक्रम करू देत नव्हते. या मैदानाला टाळे ठोकण्याची कारवाई ज्या पैठणकर अधिकार्‍याने केली आहे त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणीही परांजपे यांनी केली.

नजीब मुल्ला यांनी देखील आव्हाडांवर टीका केली असून लहान मुलांचा वापर करून राजकारण करणे योग्य नसल्याचे मुल्ला म्हणाले. खेळाचं राजकारण नको, मुलांचा वापर करायचा हे दुर्दैवी आहे, क्रिकेटसाठी माझं काय योगदान आहे ते सर्वांना माहीत आहे,मात्र या ठिकाणी पैसे घेऊन सरकारी जागेत प्रशिक्षण होतं असा आरोप मुल्ला यांनी यावेळी केला.

पार्किंगचे हप्ते कोण घेतो?

सरकारी जागेवर तर्फ बांधब्यात आला आहे, शासकीय जमिनी यांचा मालकीच्या आहेत का? असा प्रश्न देखील मुल्ला यांनी उपस्थित केला. स्टेशनला असलेलं

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news