संजय राऊत
संजय राऊत

गुजरातला गेलेले उद्योग परत आणा मग दावोसला जा : संजय राऊत

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा  स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणार्‍या जागतिक आर्थिक परिषदेच्या (World Economic Forum) बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (दि.16) दहाजणांच्या शिष्टमंडळासमवेत दावोसला रवाना झाले. त्‍या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्‍ट्रातून गेलेले उद्योग परत आणा मग दावोसला जा असे टीकास्‍त्र त्‍यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सोडले.

सत्‍य काय ? यावर ठाकरेंची महापत्रकार परिषद आज होणार

त्‍या विषयी बोलताना राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर जो निकाल दिला, त्‍यावर सत्‍य काय? यावर उद्धव ठाकरे आज महापत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत दिल्‍लीतील कायदेतज्ञ उपस्‍थित असतील अशी माहिती त्‍यांनी दिली. तुमच्यात हिंमत असेल तर अशी पत्रकार परिषद घ्‍या असे आवाहन देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० वर्षात एक पत्रकार परिषद घेवू शकत नाहीत आणि आम्‍हाला पत्रकार परिषद का घेता असा प्रश्न त्‍यांनी विचारला.

मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा म्‍हणजे राज्‍याची तिजोरीची लूट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोसला गेल्‍याच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचा आणि इतर मंत्र्यांचा हा दौरा म्‍हणजे सरकारी पैशांची लूट आहे. तुम्‍हाला उद्योग आणायचे असतील तर आधी महाराष्‍ट्रातून गुजरातला गेलेले उद्योग महाराष्‍ट्रात आणा मग दावोसला जा अशी टीका केली.

काही बडे उद्‍योगपती आणि दिल्‍लीतल्‍या भाजपच्या नेत्‍यांना मुंबई आपल्‍या ताब्‍यात हवी आहे. त्‍यामुळे उद्योगपतींच्या दबावातून दुसऱ्या पक्षातून लोक फोडून भाजपमध्ये घेतले जात असतील तर शिंदे गटाचे काही खरे नाही अस राउत म्‍हणाले.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news