प्लॅटिनम आयातीवरील कर 15.4 टक्क्यांपर्यंत वाढला

platinum bar
platinum bar

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : प्लॅटिनम आयातीला काही प्रमाणात आळा बसावा, यासाठी या धातूवरील कर 10.75 टक्क्यांवरुन 15.4 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याबाबतचे दिशानिर्देश जारी केले आहेत.

केंद्र सरकारने गेल्या जुलै महिन्यात सोन्याच्या आयातीवरील कर 15 टक्क्यांपर्यंत वाढविला होता. मात्र, त्यावेळी प्लॅटिनम आयातीवरील कर 15.4 टक्क्यांवरच जैसे थे ठेवण्यात आले होते. मागील काही काळात प्लॅटिनमच्या आयातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्लॅटिनम असल्याचे सांगत सोन्याची तस्करी करण्याच्या घटनादेखील वाढल्याने प्लॅटिनमच्या आयात करात 15.4 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोने आणि प्लॅटिनम यांच्यातील आयात कर एका स्तरावर आल्याने प्लॅटिनमच्या नावाखाली सोन्याची तस्करी होणे थांबेल, असा सरकारचा विश्वास आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news