लैंगिक छळ प्रकरणात ‘तारक मेहता…’ चे निर्माते असित मोदींना मोठा धक्का; जेनिफर मिस्त्री यांचा विजय

लैंगिक छळ प्रकरणात ‘तारक मेहता…’ चे निर्माते असित मोदींना मोठा धक्का; जेनिफर मिस्त्री यांचा विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोचे निर्माते असित कुमार मोदी यांना लैंगिक छळ प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या शोमधील अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांनी असित मोदी यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार दिली होती. मोदी यांना न्यायालयाने पाच लाखांचा दंड सुनावण्यात आला आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये श्रीमती रोशनी सोधी ही भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांना त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील लैंगिक छळ प्रकरणात सुनावणी झाली. या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे. आता शोचे निर्माते असित कुमार मोदी यांना पैसे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असित मोदी यांना थकबाकी आणि ५ लाख रुपये भरपाई असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये श्रीमती सोधी म्हणजेच जेनिफर मिस्त्री यांनी असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. २४ मे २०२३ रोजी बन्सीवाल यांनी मुंबई पोलिसांत असित कुमार मोदी यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. आता तब्बल महिनाभरानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंद केला. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या सुनावणीवर जेनिफर मिस्त्रीने आरोपीला शिक्षा न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

लोकप्रिय टीव्ही शोमधून प्रसिद्धी मिळविलेल्या अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या शोमध्ये तिने रोशन सोधी ही प्रसिद्ध भूमिका साकारलेली होती. जवळपास १५ वर्ष या भूमिकेसाठी तिने काम केले. या अभिनेत्रीने शोचे निर्माते असित कुमार मोदी, सोहिल रमाणी आणि जतिन रमाणी यांच्याविरोधात मानसिक आणि लैंगिक छळाचे गंभीर आरोप झाल्यानंतर ती चर्चेत आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news