Swiggy Riders Strike : स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजचा बेमुदत संप! ऑनलाईन फूड मागवणे होणार महाग

Swiggy Riders Strike : स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजचा बेमुदत संप! ऑनलाईन फूड मागवणे होणार महाग

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेंगळुरूस्थित फूड डिलिव्हरी एग्रीगेटर असलेल्या स्विगीशी संलग्न असलेल्या रायडर्सनी मुंबईत "अनिश्चित काळासाठी संप" सुरू केला आहे. मिन्ट या इंग्रजी माध्यामाने दिलेल्या माहितीनुसार, जास्त मोबदला आणि कामाची परिस्थिती सुधारावी यासाठी आज (दि. ९) हा संप पुकारला आहे.

बेंगळुरूस्थित फूड डिलिव्हरी एग्रीगेटर स्विगीचे कर्मचारी मुंबईत संपावर गेल्याच्या बातमीने मोठा परिणाम झाल्याचे पहायला मिळाले. कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. उच्च वेतन आणि चांगल्या कामाच्या परिस्थितीच्या मागणीसाठी डिलीव्हरी रायडर्सनी मुंबईत "अनिश्चित काळासाठी संप" सुरू केला आहे. नॅशनल स्टाफ आर्मीच्या स्विगी युनिटने हा स्ट्राइक सुरू केला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना पक्षाशी संलग्न असलेली ही कामगार संघटना आहे. सोशल मीडियावर यासंपाचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये स्विगीचे कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी फलक घेऊन बाइक रॅली काढताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news