Animal : मी रणबीरचा मोठा फॅन; महेश बाबूच्या संवादानंतर रणबीरची हटके रिॲक्शन

Animal
Animal
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल यांच्या आगामी 'अ‍ॅनिमल' ( Animal ) या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. चाहत्यांचा लाडका अभिनेता रणबीरचा हा चित्रपट येत्या १ डिसेंबर २०२३ रोजी भेटीस येत आहे. याआधी रिलीज झालेला चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर, गाणी आणि टिझरही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. आता चित्रपटासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांनी त्याच्या प्रमोशनसाठी कोणतीच कसर सोडलेली नाही. दरम्यान साऊथचा सुपरस्टार महेश बाबूने रणबीर कपूरचे कौतुक केले. यानंतर रणबीर मात्र, हटके रिॲक्शन दिली आहे.

संबंधित बातम्या 

१ डिसेबरला ( Animal ) चित्रपट सर्वत्र रिलीज होणार असल्याने चित्रपटाची संपूर्ण टिम प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच दरम्यान 'अॅनिमल' या चित्रपटाचा रिलीजच्या आधी एक प्री कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमात साऊथ स्टार महेश बाबू पाहुणे कलाकार म्हणून उपस्थित होते. दरम्यान महेश बाबूनी रणबीरचे भऱभरून कौतुक करताना त्याचा मोठा फॅन असल्याचे सांगितले आहे.

'मी रणबीर कपूरला याआधीही सांगितले आहे की, मी त्याचा खूपच मोठा फॅन आहे. परंतु, त्याने माझे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. आज मी पुन्हा सांगतो की, रणबीर कपूरचा मी फॅन आहे. तो मला आवडतो आणि तो देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेता देखील आहे.' असे म्हटलं आहे. या कार्यक्रमाच्या स्टेजवर मागे उभे असलेला रणबीर थोडा हसतो आणि नंतर भावूक होतो.

जेव्हा रणबीरला बोलण्याची संधी मिळते त्यावेळी तो म्हणतो की, ' मी भेटलेले पहिले सुपरस्टार महेश बाबू हे आहेत. मला आठवतं की, 'ओक्कडू' चित्रपट पाहिल्यानंतर मी त्यांना मेसेज केला होता आणि त्यांनी रिप्लाय दिला होता. तुमच्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी तुमचे कितीही आभार मानावे तेवढे कमीच आहेत. असे रणबीरने म्हटलं आहे.

या कार्यक्रमाला चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली उपस्थित होते. 'ॲनिमल' या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलं आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर चाहत्यांनी भरभरून लाईक्स केलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news