तिहार तुरुंगात मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर ठेवले जाणार विशेष लक्ष

सत्येंद्र जैन
सत्येंद्र जैन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तिहार तुरुंगात सर्व प्रकारच्या सुविधा उपभोगत असल्याचा आरोप झालेल्या आप सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश तुरुंग प्रशासनाने दिले आहेत. हवाला प्रकरणात गंभीर आरोप झालेले जैन हे मागील काही महिन्यांपासून तिहार येथील तुरूंगात आहेत.

सत्येंद्र जैन हे तुरुंगात विलासी जीवन जगत असल्याचे व्हिडिओ अलीकडील काळात व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांना मदत करीत असलेल्या तुरुंग अधिकाऱ्याचे सेवेतून निलंबन करण्यात आले होते. दरम्यान, जैन यांच्या खोलीत असलेली खुर्ची, टेबल आणि इतर साहित्य हटविले आहे. पुढील १५ दिवसांत त्यांना कोणी भेटू नये, असे निर्देशही तुरुंग प्रशासनाने जारी केले आहेत.

उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी तिहारमधील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. समितीच्या शिफारशीनुसार, जैन यांच्या सुविधा काढून घेण्यात आल्या आहेत. इतर कैद्यांनी जैन यांना भेटू नये, असेही निर्देशात म्हटले आहे.

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news