सिंधुदुर्ग : तळेरे वाघाचीवाडी फाट्यानजीक कारची ट्रकला धडक; एकजण जखमी

कारची ट्रकला धडक
कारची ट्रकला धडक
Published on
Updated on

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी फाटयानजीक कारचा अपघात झाला. पुण्यावरून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या कार चालकाचा कारवरील ताबा सुटून ती मालवाहू ट्रकला मागून धडकली. या अपघातात कार मधील एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून कारच्या पुढील भागाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर अपघात आज (शनिवार) सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडला.

या अपघाताची सविस्तर माहिती अशी की, पुण्यावरुन आपल्या ताब्यातील इंर्टीका कार घेऊन चालक निखल गुंड (वय 30), रा. पुणे व सहप्रवाशी देवा रेडियार, (वय 30), रा.पुणे हे सावंतवाडीच्या दिशेने जात होते. तरेळे वाघाचीवाडी फाटा नजीक आले असता चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार सरळ बाजूला असणा-या माहवाहू ट्रकवर जाऊन मागच्या लोखंडी बंपरवर आदळली. या अपघातानतंर दोनही एयर बॅग खुल्या झाल्याने ही धडक जोरदार झाल्याचे स्थानिकांकडून समजते.

धडकेनतंर चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेले देवा रेडियार यांना या अपघातादरम्यान डोक्याला गंभीर दुखापत होत मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत कासार्डे येथील 108 रुग्णवाहीकेस संपर्क केला. चालक रुपेश राणे, डॉ. अनिरुध्द मुद्राळे यांनी तातडीने दाखल होत प्राथमिक उपचार करत रुग्णवाहीकेने कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानतंर दुखापत गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात दाखल करत त्याच्यावर अधिक उपचार सुरु आहेत. या अपघातात चालकास कोणतीही दुखापत झाली नसून कारचे पुढील भागाचे नुकसान झाले आहे. सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने मोठया प्रमाणात मुंबईकर चाकरमानी व पर्यटक जिल्हात दाखल झाले आहेत. वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. गेल्या दोन दिवसांतील महामार्गावरील हा दुसरा अपघात आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news