Prakash Ambedkar : पक्ष सोडून जाणे धक्कादायक, पण पक्षावर काही परिणाम होत नाही : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : पक्ष सोडून जाणे धक्कादायक, पण पक्षावर काही परिणाम होत नाही : प्रकाश आंबेडकर

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : आमच्या पक्षात मंत्री होते. आमदार होते ते निघून गेले. पण पक्ष म्हणून काही परिणाम झाला नाही. एखाद्याचे पक्ष सोडून जाणे हे धक्कादायक असते. मात्र, त्याने पक्षावर काही परिणाम होतो, असे मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज (दि.१२) दिली. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व आमदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा आज दिला. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी मत व्यक्त केले आहे.  Prakash Ambedkar

 राजकीयदृष्ट्या दिवाळखोर भाजप जशा-जशा निवडणुका जवळ येत आहेत, तसेतसे हताश होत आहेत. भाजप ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून विरोधी पक्षातील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये येण्यास भाग पाडत आहे. काही नेत्यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी तयारी दाखवली असली, तरी महाविकास आघाडी मजबूत राहील, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. Prakash Ambedkar

काँग्रेसचे माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला आहे. दोन दिवसांत ते राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी मजबूत राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे. Vanchit Bahujan Aaghadi

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news