शिर्डी साईमंदिर ३१ डिसेंबरला रात्री दर्शनासाठी बंद

शिर्डी साईमंदिर ३१ डिसेंबरला रात्री दर्शनासाठी बंद

शिर्डी (पुढारी वृत्तसेवा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त 31 डिसेंबर रोजी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

राज्यात ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 25 डिसेंबरपासून रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 25 डिसेंबरपासून साई मंदिर रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news