Supreme Court : ती एक पुरुष आहे! पतीची पत्नीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव, फसवणूक केल्याचा दावा

Supreme Court : ती एक पुरुष आहे! पतीची पत्नीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव, फसवणूक केल्याचा दावा
Published on
Updated on

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : ती महिला नसून पुरुष आहे, असा दावा करत एका पुरुषाने पत्नीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पत्नीला पुरुषाचे जननेंद्रिय असून तिने फसवणूक केली आहे. याप्रकरणी तिच्यावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी एका पुरुषाने याचिकेतून केली आहे. या याचिकेचे परीक्षण करण्याचे सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी मान्य केले केले.

सुप्रीम कोर्टात (Supreme Court) काल शुक्रवारी याबाबत एक खटला दाखल झाला. पहिल्यांदा कोर्ट या याचिकेवर सुनावणी करण्यास नाखूश होते. परंतु खटला दाखल केलेल्या पुरूषाने मेडिकल रिपोर्ट सादर केल्याने खटल्यावर सुनावणी घेण्यास कोर्टाने सहमती दर्शवली. आपल्या पत्नीला पुरुषाचे जननेंद्रिय असल्यामुळे फसवणूक केल्याबद्दल तिच्यावर फौजदारी खटला चालवावा अशी त्याने मागणी याचिकेतून केली आहे.

सुरुवातीला या याचिकेवर सुनावणी करण्यास नाखूष असलेले, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने पत्नीकडून उत्तर मागितले. यानंतर याचिका दाखल केलेल्या पुरुषाने मेडिकल अहवाल दिला. यामध्ये त्याच्या पत्नीला पुरुषाचे जननेंद्रिय आणि छिद्रहीन हायमेन (penis and an imperforate hymen) आहे. इम्परफोरेट हायमेन हा एक जन्मजात विकार आहे ज्यामध्ये हायमेन योनीमार्गात पूर्णपणे अडथळा येतो.

Supreme Court : मेडिकल रिपोर्टचा आधार घेत वकिलांचा युक्तिवाद

याचिकाकर्त्याची बाजू मांडताना वरिष्ठ वकील एनके मोदी यांनी खंडपीठाला सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत फौजदारी गुन्हा घडला आहे कारण पत्नी "पुरुष" आहे. ही निश्चितच फसवणूक आहे. कृपया तुम्ही मेडिकल रिपोर्ट पहा. हे काही जन्मजात विकाराचे प्रकरण नाही. माझ्या अशिलाची फसवणूक झाल्याचे त्यांनी यामध्ये नमूद केले आहे. तिला तिच्या गुप्तांगाबद्दल निश्चितपणे माहिती होते. पण तिने जाणीवपुर्वक टाळत फसवणूक केल्याचा युक्तिवाद वरिष्ठ वकील मोदी यांनी कोर्टात केला.

वकिलांनी या प्रकरणात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा एका निकालाचा आधार घेत युक्तिवाद केला. फसवणुकीच्या आरोपाची दखल घेत पत्नीला समन्स बजावणाऱ्या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जून २०२१ मधील निकालाविरुद्ध वरिष्ठ वकीलांनी युक्तिवाद केला. छिद्रहीन हायमेनमुळे (imperforate hymen) पत्नीला स्त्री म्हणता येणार नाही हे दाखवण्यासाठी पुरेसे वैद्यकीय पुरावे आहेत, असा युक्तिवाद त्यांनी केला.

वरिष्ठ वकील मोदी म्हणाले की, केवळ पत्नीला छिद्रहीन हायमेन नाही तर लिंग देखील आहे. रुग्णालयाचा वैद्यकीय अहवालमध्ये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. पुरुषाचे जननेंद्रिय असताना ती स्त्री कशी असू शकते? यावर न्यायालयाने मोदींना विचारले तुमच्या अशिलाचे नेमके काय म्हणणे आहे? यावर मोदी म्हणाले की, एफआयआरवर योग्य ती कारवाई व्हावी आणि पत्नीने त्याला फसवल्याबद्दल त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल कायद्याने शिक्षा व्हावी अशी त्या व्यक्तीचे म्हणणे आहे.

न्यायालयाने पुढे नमूद केले की, पत्नीने पुरुषाविरुद्ध IPC कलम ४९८ अ (क्रूरता) अंतर्गत फौजदारी खटलादेखील दाखल केला आहे. मोदी यांनी खंडपीठाला सांगितले की त्यांच्या अशिलाविरुद्धचा खटलादेखील प्रलंबित आहे. त्यानंतर खंडपीठाने पत्नी, तिचे वडील आणि मध्य प्रदेश पोलिसांना नोटीस बजावून सहा आठवड्यांत उत्तर मागवले आहे.

मे २०१९ मध्ये, ग्वाल्हेरच्या दंडाधिकाऱ्यांनी पुरुषाने दाखल केलेल्या तक्रारीवरून पत्नीविरुद्ध फसवणुकीच्या आरोपाची दखल घेतली होती. त्याने आरोप केला की २०१६ मध्ये त्यांच्या लग्नानंतर, त्याला समजले की पत्नीला पुरुषाचे जननेंद्रिय आहे आणि ती लग्न करण्यास शारीरिकदृष्ट्या अक्षम आहे. पत्नी आणि तिच्या वडिलांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी त्या व्यक्तीने ऑगस्ट २०१७ मध्ये न्यायालयात धाव घेतली.

हिंदू विवाह कायदा (HMA) अंतर्गत, क्रूरता – मानसिक तसेच शारीरिक – घटस्फोट मागण्यासाठी एक आधार आहे. पती-पत्नीवर खोटे आरोप लावणे हे घटस्फोटाची मागणी करण्यासाठी वैध कारण म्हणून देखील मांडण्यात आले आहे. HMA अंतर्गत घटस्फोट हा दोष सिद्धांतावर आधारित आहे आणि त्यात व्यभिचार, त्याग, इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर, वेडेपणा, लैंगिक रोग, जगाचा त्याग आणि घटस्फोटाची इतर कारणे म्हणून मृत्यूची धारणा समाविष्ट आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news