पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'भाबीजी घर पर हैं' ही मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत 'अनीता भाभी'ची मुख्य भूमिका मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेने साकारली आहे. दरम्यान अनिता भाभीची भूमिका साकारणाऱ्या नेहा पेंडसेच्या घरातून ६ लाखांचा रुपयांची चोरी झाली आहे. नेहाच्या घरातील एका नोकराने ६ लाखांचे दागिने चोरून पळ काढलाय. यानंतर नोकराच्या विरोधात नेहाच्या पतीने शार्दुल पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. या नोकराचे नाव सुमित कुमार सोलंकी असे आहे.
संबंधित बातम्या
एका रिपोर्टच्या माहितीनुसार, 'भाबीजी घर पर हैं' मालिकेतील 'अनीता भाभी' म्हणजे, नेहा पेंडसे तिच्या पती शार्दुलसोबत अरिटो बिल्डिंग, वांद्रे पश्चिम, मुंबईत राहते. दरम्यान शार्दुलला घरातील ६ लाखांचे दागिने लंपास झाल्याची माहिती पोलिसांना दिली आणि घरातील नोकराच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या तक्रारीत शार्दुलने चोरीला गेलेल्या वस्तुत सोन्याचे ब्रेसलेट आणि हिऱ्याची अंगठी असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान पोलिसांनी घरातील सर्व नोकरांना बोलावून त्याची चौकशी केली. मात्र, या चौकशीदरम्यान नेहा पेंडसे घरात राहत असेलला नोकर सुमित कुमार सोलंकी बेपत्ता असून तो कुलाब्यात असल्याचे समजते. यानंतर पोलिसांनी त्याला फोनवरून या चोरीबद्दल विचारणा केली असताना त्यांने उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. या प्रकारावरून पोलिसांनी त्याच्यावर संशय घेत सुमितला अटक केली. मात्र, चोरीचे दागिने अद्याप सापडलेले नाहीत. दरम्यान त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ड्राइव्हरने दिलेल्या माहितीनुसार, नोकर सुमित सोलंकीची दागिन्यांवर नजर पडली आणि त्याने त्याच्यावर डल्ला मारला. नेहाच्या घरी सुमित इतर लोकांसोबत राहत होता. सोन्याचे ब्रेसलेट आणि हिऱ्याची अंगठी या दोन्ही गोष्टी नेहाने शार्दुलला गिफ्ट केल्या होत्या. तर दुसरीकडे ही चोरीची घटना बाहेर कशी लीक झाली याबाबत नेहा आश्चर्यचकित व्यक्त करत आहे.
वर्कफ्रंडबद्दल बोलायचे झाल्यास, नेहाने 'मे आय कम इन मॅडम' या मालिकेसह अनेक टीव्ही शो केलं आहेत, परंतु, तिला खरी लोकप्रियता 'भाबीजी घर पर हैं!' मालिकेतून मिळाली.