Senthil Balaji : ईडीने ताब्यात घेतल्यानंतर ‘सेंथिल बालाजी’ यांची तब्येत बिघडली; आयसीयूत दाखल; डीएमके, काँग्रेसकडून निषेध

senthil balaji
senthil balaji
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Senthil Balaji : तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांना एका मनि लाँड्रिंग केसमध्ये ईडीने (अंमलबजावणी संचलनालय) रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्यानंतर बालाजी यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना चेन्नईच्या सरकारी रुग्णालयात आज बुधवारी सकाळी आयसीयूत दाखल करण्यात आले. या घटनेबाबत डीएमके, काँग्रेससह अन्य पक्षांनी या कारवाईवरून भाजपला आणि केंद्र सरकारला घेरले आहे.

बालाजी (Senthil Balaji) यांना टॉर्चर करण्यात आले – पी सेकर बाबू

डीएमकेच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, बालाजी यांनी त्यांच्या परिसरातील छापेमारी नतर अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली होती. तसेच राज्यमंत्री पीके सेकर बाबू यांनी बालाजी यांची अवस्था पाहून असे वाटते की त्यांना टॉर्चर करण्यात आले आहे, असा आरोप केला आहे. दरम्यान, काही रिपोर्टच्या अनुसार बालाजी यांना अटक केल्याची माहिती आहे. मात्र अधिकृतरित्या अद्याप कोणतेही वृत्त आलेले नाही.

पी सेकर बाबू माध्यमांशी बोलताना म्हणाले, ते म्हणाले की, उर्जामंत्र्यांना सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तो बेशुद्ध आहे आणि त्याचे नाव पुकारल्यावरही तो प्रतिसाद देत नाही. त्याच्या कानाजवळ सूज आहे. त्याच्या ईसीजीमध्येही बरेच चढ-उतार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बाबूने बालाजी यांना टॉर्चर केल्याचा आरोप केला आहे.

Senthil Balaji : डीएमकेच्या मंत्र्यांनी ईडीकडून मागितले स्पष्टीकरण

दरम्यान, बालाजी यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे वृत्त ऐकूण डीएमकेच्या मंत्री त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात येत आहेत. यावेळी राज्याचे कायदे मंत्री एस रघुपती यांनी त्यांच्या अटकेवर स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. त्यांनी बालाजी यांच्या घरी तासनतास चाललेल्या ईडीच्या रेडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच डीएमकेच्या वकिलांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी बालाजी यांना अटक केली आहे का नाही हे तातडीने स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

Senthil Balaji : आम्ही केंद्राच्या धमक्यांना घाबरणार नाही

तामिळनाडूचे स्वास्थ्य मंत्री एम सुब्रमण्यन आणि राज्याचे खेळ मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे देखील बालाजी यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. यावेळी ते म्हणाले बालाजी यांच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी आम्ही कायद्याची मदत घेऊ या. तसेच त्यांनी भाजपला खडे बोल सुनावले. ते म्हणाले आम्ही भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या धमकावणाऱ्या राजकारणाला घाबरणार नाही. सेंथिल बालाजी यांना ठरवून टार्गेट केले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची 24 तास चौकशी केली. हे मानवाधिकाऱाच्या पूर्णपणे विरोधी आहे. ईडीला याचे उत्तर द्यावे लागेल.

Senthil Balaji : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून निषेध

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांना अंमलबजावणी संचालनालयाने रात्री उशिरा केलेल्या अटकेचा निषेध केला.

"हा विरोध करणार्‍यांचा मोदी सरकारकडून राजकीय छळ आणि सूडबुद्धीशिवाय काहीच नाही. विरोधी पक्षातील आपल्यापैकी कोणीही अशा हालचालींमुळे घाबरणार नाही," अशा शब्दात त्यांचा निषेध केला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news