School Reopen : शाळा ठरल्याप्रमाणेच १ डिसेंबरपासून सुरु होणार ! आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

School Reopen : शाळा ठरल्याप्रमाणेच १ डिसेंबरपासून सुरु होणार ! आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

ओमिक्रॉन हा अत्यंत घातक व्हेरिएंट असल्याने या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करायच्या की नाही याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, याबाबत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाळा ठरल्याप्रमाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. (School Reopen)

काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे

ओमिक्रॉनचं संकट अजून महाराष्ट्रात पोहचलेलं नाही. मात्र सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. ठरल्याप्रमाणे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरू झाल्यावर कोणत्या नियमावलीचे पालन करायला हवे याची सुचना सर्व शाळांपर्यंत पोचवण्यात येणार (School Reopen)

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने साधारणपणे गेल्या २ वर्षांपासून बंद असणाऱ्या ऑफलाईन शाळा १ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, आता कोरोनाचा ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटची पुन्हा एकदा धडकी भरली आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका शिक्षण विभागाच्यावतीने आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासमोर सादर केला जाणार असून मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news