सावंतवाडी नगरपालिका प्रभाग रचना व आराखडा जाहीर

सावंतवाडी नगरपालिका
सावंतवाडी नगरपालिका

सावंतवाडी पुढारी वृत्तसेवा: सावंतवाडी नगरपालिका आगामी निवडणुकीसाठी गुरुवारी शहराचा प्रारूप प्रभाग रचना व आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या आराखड्यावर येत्या 17 मार्चपर्यंत हरकती नोंदवायच्या असून अंतिम आराखड्याला जिल्हाधिकारी मान्यता देणार आहेत. त्यानंतर हा मंजूर आराखडा पुढील प्रक्रियेसाठी कोकण भवन आयुक्तांना पाठवण्यात येणार आहे.

सावंतवाडी नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्या द़ृष्टीने स्थानिक पातळीवर नगरपालिकांनी प्रारूप प्रभाग रचना व आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. अद्याप नगरपालिका निवडणुकांची तारीख जाहीर झाली नसली तरी मतदार याद्या पुनरीक्षण, प्रारूप आराखडा, प्रभाग रचना, आरक्षण आदी प्रक्रिया पालिकांनी स्थानिक पातळीवरच पूर्ण करावयाच्या आहेत.

त्यानुसार सावंतवाडी नगरपालिकेने गुरुवारी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुढील निवडणूक कार्यक्रम लक्षात घेत प्रारूप प्रभाग रचना व आराखडा जाहीर केला आहे.

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहराचा प्रभाग रचना आराखडा तयार करण्यात आला असून यात 10 प्रभागांचा समावेश आहे. प्रत्येक प्रभागात 2 अशा प्रमाणे 20 जागांसाठी लढत होणार आहे. म्हणजेच प्रत्येक प्रभागातूंन दोन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.

सन 2011 ची जनगणना ग्राह्य मानून हा आराखडा तयार करण्यात आला असून येणार्‍या निवडणुकीत एकूण 23 हजार 851 नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती नगरपालिकेचे अधिकारी शिवप्रसाद कुडपकर यांनी दिली.

हा प्रभाग रचना आराखडा जाहीर करण्यात आला. येत्या 17 मार्च पर्यत नागरिकांनी आपल्या हरकती नोंदवायच्या आहेत. त्यानंतर अंतिम आराखड्याला जिल्हाधिकारी मंजुरी देणार आहेत.

या आराखड्यावर लेखी आक्षेप घेता येणार आहेत. यात दहा प्रभागांमध्ये शहराची रचना करण्यात आली असून प्रत्येक प्रभागात दोन जागांसाठी लढत आहे. यात मागासवर्गीयमध्ये 1121, तर अनुसूचित जाती जमातीमध्ये 176 मतदार आहेत. पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हा प्रभाग रचना आराखडा जाहीर करण्यात आला आहे.

  • शहरात एकूण 10 प्रभागांची निर्मिती
  • सन 2011 च्या जनगणनेवर आधारित आराखडा
  • हरकती नोंदविण्यासाठी 17 मार्चपर्यंत मुदत
  • प्रत्येक प्रभागातून निवडले जाणार दोन नगरसेवक
  • निवडणुकीसाठी 23 हजार 851 मतदार निश्चित

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news