सातव्या मुलीची सातवी मुलगी : पंचपिटिका रहस्याच्या पहिल्या पेटीतून काय उलघडणार?

सातव्या मुलीची सातवी मुलगी : पंचपिटिका रहस्याच्या पहिल्या पेटीतून काय उलघडणार?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत लवकरच पंचपिटिका रहस्याचा पहिल्या पेटीचं रहस्य उलगडणार आहे.

संबंधित बातम्या 

येणाऱ्या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल नेत्रा आणि इंद्राणीला पंचपिटिका रहस्यातील पहिली पेटी सापडते. ती पेटी नेत्रा-इंद्राणी राजाध्यक्षांच्या घरी येऊन येतात. रूपाली ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करते. पण रुपालीला धक्का बसतो आणि ती पेटी उघडता येत नाही.

अखेर नेत्रा आणि इंद्राणी त्रिनयना देवीचा ग्रंथ आणि ही पहिली पेटी त्रिनयना देवीच्याच मंदिरात ठेऊन येण्याचे ठरवतात. पण इंद्राणीचं रक्त लागून ती पेटी उघडते. आता या पहिल्या पेटीत नक्की काय रहस्य दडलंय? हे पाहणे मनोरंजनात्मक असणार आहे. यामुळे 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेसाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news