सातारा : प्रतापगंज पेठेतील गोराराम मंदिर

सातारा : प्रतापगंज पेठेतील गोराराम मंदिर

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहराला रामनाम व रामभक्तीचा वारसा लाभला असून शहरातील दुसरे प्रसिद्ध राम मंदिर म्हणून प्रतापगंज पेठेतील गोराराम मंदिर ओळखले जाते. सुमारे १७५ वर्षांपूर्वीचे हे मंदिर संपूर्ण लाकडामध्ये उभारण्यात आले आहे. दगडी बांधकामातील प्रवेशद्वारच मंदिराच्या पावित्र्याची साक्ष देत आहे.

मराठी साम्राज्यात छत्रपतींचे वारसदार राजाराम महाराजांच्या काळात या मंदिराची उभारणी करण्यात आली. पांडुरंग नारायण आगटे या रामभक्ताने स्वमालकीच्या जागेमध्ये गोराराम मंदिराची उभारणी केली. संगमरवरी पांढरीशुभ्र मूर्ती भाविकांचे श्रद्धास्थान ठरली आहे. पांडुरंग आगटे यांची सहावी पिढी सध्या मंदिराचे व्यवस्थापन, पूजा, अर्चा करत आहे. आगटे कुटुंबाची खासगी मालमत्ता असली तरी सातारा शहरासह जिल्ह्यातील रामभक्त मोठ्या भक्तिभावाने या मंदिरात दर्शनासाठी येतात.

मंदिरात प्रवेश करताच समोर रामभक्त हनुमानाचे छोटेखानी मंदिर आहे. उजवीकडे शंकराचे मंदिर असून त्यामध्ये जुनी दगडी पिंड आहे. त्यासमोरच दगडी चौथऱ्यावर दगडी नंदी आहे. डावीकडे गणेश मंदिर आहे. त्याच्या बाजूला एक जुनी विहीर असून, त्याभोवतीच्या चौथऱ्यातून पुरातन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो. मुख्य मंदिरासमोर मोठा सभामंडप असून मुख्य गाभाच्चात श्रीराम, सौता
व लक्ष्मणाच्या संगमरवरी मूर्ती आहेत.

मंदिरासभोवताची तटबंदीचे बांधकाम कालपरत्वे नामशेष झाले असले तरी मंदिर परिसरात जुन्या बांधकामाचे अवशेष दिसत आहेत. सध्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news