Ae Watan Mere Watan : देशाची कहानी… ; ‘ऐ वतन मेरे वतन’ ओटीटीवर; सारा- इमरान हाश्मीचा कॅमियो

Ae Watan Mere Watan
Ae Watan Mere Watan

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता इमरान हाश्मी यांचा आगामी पीरियड ड्रामा 'ऐ वतन मेरे वतन' ( Ae Watan Mere Watan ) चित्रपट चर्चेत आला आहे. हा चित्रपटात सारा आणि इमरान यांचा कॅमियो रोल असून याच वर्षी मार्च महिन्यात ओटीटी ( OTT ) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, सारा अली खानच्या मर्डर मिस्ट्री 'मर्डर मुबारक' या चित्रपटाच्या अवघ्या ६ दिवस आधी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री सारा अली खानने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर आगामी 'ऐ वतन मेरे वतन' ( Ae Watan Mere Watan ) चा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये साराचा किलर लूक दिसत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये साराचे काही डायलॉग्स ऐकू येत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने "Desh ki kahaani, Usha ki zubaani World Radio Day pa #AeWatanMereWatanOnPrime, Mar 21 only on @primevideoin" असे लिहिले आहे.

या व्हिडिओत साराने म्हटलं आहे की, 'नमस्कार देशबांधवांनो, इंग्रजांपासून स्वातंत्र्यासाठी शेवटच्या लढ्यासाठी सज्ज व्हा. मी आहे उषा आणि हा आहे देशाचा रेडिओ. 'उषाच्या शब्दात देशाची कहाणी. जागतिक रेडिओ दिनानिमित्त. 'ऐ वतन मेरे वतन' हा चित्रपट २१ मार्च २०२४ रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारित होईल.' यावरून सारा आणि इमरान हाश्मीचा हा धमाकेदार चित्रपट येत्या २१ मार्चला रिलीज होणार असल्याची माहिती मिळत आहे.

'ऐ वतन मेरे वतन' हा चित्रपट कन्नन अय्यर आणि दरब फारुकी यांनी लिहिलेला आहे. तर कन्नन अय्यर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचा निर्माता करण जोहर आहे. हिंदीसोबत 'ए वतन मेरे वतन' हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात सारा अली खान आणि इमरान हाश्मीने मुख्य भूमिका साकारली आहे. दरम्यान चित्रपटात दोघांचा एक कॅमिओ रोल करणार असल्याचे बोलले जात आहे. सारा-इमरानसोबत चित्रपटात सचिन खेडकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव आणि आनंद तिवारी हे कलाकार दिसणार आहेत. दरम्यान दुसरीकडे साराचा मर्डर मिस्ट्री 'मर्डर मुबारक' हा चित्रपट १५ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news