पुढारी ऑनलाइन डेस्क : Sanjay Raut : लोकसभा 2024 च्या निवडणुकांसाठी मविआचा 16+16+16 असा कोणताही फॉर्म्यूला ठरलेला नाही. तसेच मविआत कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. अजून लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत मविआचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केले. ठाकरे गट 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 19 जागा लढवणारच, असे मोठे विधान त्यांनी केले आहे.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत. तर उद्या बीड दौऱ्यावर जाणार आहेत. नांदेडमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. मविआमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 16+16+16 असा फॉर्म्यूला ठरला आहे, असा प्रश्न विचारला असता अजून कोणताही फॉर्म्यूला ठरलेला नाही. तसेच 2019 मध्ये आम्ही 19 जागा लढवल्या होत्या. त्यामुळे ज्या जागा ठाकरे गटाने यापूर्वी लढवल्या आहेत. त्या जागा ठाकरे गट 2024 मध्ये पुन्हा लढवणारच, असे मोठे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.
याशिवाय नाशिकमधील त्र्यंबकेश्वर घटनेवर बोलताना ते म्हणाले, नाशिकमधील त्र्यंबकेश्वरची घटना खोटी आहे. तसेच तेथील जनतेने हा डाव हाणून पाडला. यासाठी तेथील जनतेचे मी अभिनंदन करतो.
बीडमध्ये अप्पासाहेब जाधव यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत बोलताना (Sanjay Raut) राऊत म्हणाले, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक पक्षाची शिस्त असते. शिस्त भंग करणाऱ्यांवर कारवाई करणे योग्यच आहे. सुषमा अंधारे पक्षाच्या उपनेत्या आहेत. त्यांच्यावर आरोप केल्याने पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आले आहे.
याच वेळी त्यांनी भाजपवर देखील टिका केली आहे. भाजपचा पोपट मेलेला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी फडणवीसांवर देखील टिका केली. ते म्हणाले फडवीस यांच्या भाषणावेळी भाजपचे निम्मे कार्यकारिणी झोपले होते. तसेच हिंमत असेल तर मुंबई मनपा निवडणूक घ्या, असे खुले आव्हान देखील त्यांनी दिले.
हे ही वाचा :