सांगली : शासकीय, निमशासकीय कार्यालयात मास्क बंधनकारक

सांगली : शासकीय, निमशासकीय कार्यालयात मास्क बंधनकारक

सांगली; पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या आदेशानुसार कोरोना आजाराची व्याप्ती वाढू नये, यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रकारची शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे, तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.

राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्वतयारी व उपाययोजना राबविण्याचे शासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार गर्दीच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच आठवडे बाजार, बसस्थानक परिसर, यात्रा, मेळावे, लग्न समारंभ अशा ठिकाण सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. तसेच सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी केले आहे.

कोरोनाची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडित आहेत. त्यामध्ये खोकला, श्वास घेण्याचा त्रास, निमोनिया, ताप, अशी प्राथमिक लक्षणे आहेत. कोरोनाचा विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने हवेवाटे त्याचप्रमाणे शिंकणे, खोकणे, हस्तांदोलनातून होतो.

या व्यक्तींनी घ्यावी विशेष काळजी

कोरोना आजाराचा 50 वर्षांवरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर व किडनीचे आजार असलेल्या तसेच ज्या नागरिकांना यापूर्वी कोरोनाची लागण होऊन गेली आहे, अशा नागरिकांनी वेळोवेळी व जेवणापूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शिंकताना, खोकताना नाक व तोंडावर रूमाल धरावा. हस्तांदोलन टाळावे, चेहरा, नाक व डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news