नवी दिल्ली, ९ जून, पुढारी वृत्तसेवा, Sangeeta Fogat : लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. शुक्रवारी पोलीस पथकाने तक्रारदार कुस्तीपटू संगीता फोगाट सोबत कुस्ती महासंघाचे कार्यालय गाठले होते. 'क्राईम सीन रिक्रिएट' करण्यासाठी पोलीस फोगाट यांना महासंघाच्या कार्यालयात घेऊन गेले होते, अशी माहिती समोर आली आहे.