Sambhajiraje Chhatrapati Contest of MP : संभाजीराजेंनी लोकसभा लढवावी : कोल्हापूरातील मेळाव्यात कार्यकर्त्यांचा आग्रह

Sambhajiraje Chhatrapati Contest of MP : संभाजीराजेंनी लोकसभा लढवावी : कोल्हापूरातील मेळाव्यात कार्यकर्त्यांचा आग्रह
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरात आज (दि. १४) संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या गटाचा भव्य  मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील संभाजीराजे गटाला नवचैतन्य प्राप्त झाले असून संभाजीराजे गट राजकीय दृष्ट्या सक्रिय झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून या मेळाव्यास उपस्थित असलेल्या संभाजीराजे गटाच्या कार्यकर्त्यांनी संभाजीराजे यांनी आगामी लोकसभा निवडणूकीच्या (Contest of MP) आखाड्यात उतरावं, अशी जोरदार मागणी केली.

हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या मेळाव्यात संभाजीराजे यांच्या येत्या ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. यासाठी वाढदिवसानिमित्त खासबाग मैदान येथे 'स्वराज्य केसरी' या निकाली कुस्त्यांचे भव्य मैदान आयोजित करण्यावर सर्वांनी एकमताने सहमती दिली. तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित झाले.

संभाजीराजे छत्रपती यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील हजारो कार्यकर्ते एकत्र येऊन हा भव्य मेळावा संपन्न झाला. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव संभाजीराजे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता, मराठा आरक्षण व इतर विषयांच्या निमित्ताने राज्यभर फिरत असताना कोल्हापूरकडे थोडे दुर्लक्ष झाले, याची खंत व्यक्त करत आता मात्र कोल्हापुरात पूर्ण ताकदीने कार्यरत होणार आहे, असा विश्वास संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

यावेळी स्वराज्य पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख राहुल शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर, संजय पवार, फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले, युवराज संभाजीराजे छत्रती यांचे सचिव अमर पाटील यांनी आभार मानले.

या मेळाव्यास कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय पवार, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, माजी नगरसेवक विनायक फाळके, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, स्वराज्य पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख राहुल शिंदे, विकास देवाळे, दिपक सपाटे, प्रविण डोणे, रायसिंग चौगुले (हरपवडे), शिवाजी गायकवाड – सरपंच-वरणगे पाडळी, मनोज पाटील – सरपंच-परिते, सुभाष पाटील – सरपंच-कळे, जयवंत पताडे – सरपंच-बनाचीवाडी, अजिंक्य गोणूगडे – उपसरपंच-राशीवडे, धनाजी पाटील – सरपंच-कोदवडे, गणी अजरेकर – मुस्लिम बोर्डिंग, अभिजित पाटील – माजी सरपंच-भुये, राजेंद्र ठोंबरे – अध्यक्ष, पाटाकडील तालिम मंडळ, अच्यूत साळोखे, पैलवान बाबा महाडिक, सिकंदर मुजावर – माजी सरपंच-आंबेवाडी, अनिल कदम, दिगंबर फराकटे, योगेश मुळीक, संदिप चौगुले आदि उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news