संभाजी भिडे हे भाजपचे पिल्लू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वी केला. करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील होते, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. दरम्यान, राज्यभरात संभाजी भिडे समर्थक-विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. अधिवेशनात हा मुद्दा वादळी ठरला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे गट नेते बाळासाहेब थोरात यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.